Sanjay Raut : संजय राऊतांचा डबल धमाका, नाशिकमधील भाजप अन् वंचितचे दोन बडे मोहरे फोडले, ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश
Maharashtra Assembly Elections 2024 : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. संजय राऊत यांनी भाजप आणि वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का दिला आहे.
नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे. राज्यात 20 नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) प्रचाराचा धुराळा उडाला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे कालपासून नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. आज संजय राऊत यांनी नाशिक दौऱ्यावर असताना भाजप (BJP) आणि वंचित बहुजन आघाडीला (Vanchit Bahujan Aghadi) मोठा धक्का दिला आहे.
शनिवारी संजय राऊत नाशिकमध्ये दाखल झाले. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे (Nashik West Assembly Constituency) महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) आणि नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाचे (Nashik Central Assembly Constituency) उमेदवार वसंत गीते (Vasant Gite) यांची प्रचार सभा संजय राऊत यांनी घेतली. या प्रचार सभांमधून त्यांनी भाजप आणि महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आज संजय राऊत मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. मात्र, मुंबईकडे रवाना होताना संजय राऊत यांनी भाजप आणि वंचितला धक्का दिलाय.
पवन पवार ठाकरे गटाच्या वाटेवर
वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार हे वंचितला सोडचिठ्ठी देत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. पवन पवार यांनी 2019 साली वंचितकडून लोकसभा निवडणूक लढवली आहे. त्यांना तब्बल 1 लाख 9 हजार 981 मते मिळाली होती. तसेच नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात पवन पवार यांचा दबदबा आहे. आता पवन पवार यांच्यामुळे ठाकरे गटाला नाशिकमध्ये फायदा होऊ होऊ शकतो,असे बोलले जात आहे.
विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करणार
तसेच भाजपचे विक्रम नागरे देखील शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. विक्रम नागरे यांनी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार सीमा हिरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आमची नाराजी दूर होत नसल्याने आम्ही पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे विक्रम नागरे यांनी म्हटले आहे. विक्रम नागरे यांच्यामुळे सीमा हिरे यांना फटका बसू शकतो,असे बोलले जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
अरे बाप नाही, तुझा काकाच आश्वासनं पूर्ण करणार, जयंत पाटलांनी अजितदादांवर केलेल्या विधानाची चर्चा!