एक्स्प्लोर

Sanjay Raut : 1500 रुपयात मतं विकत घेण्याचा प्रकार, हा केवळ तीन महिन्यांचा खेळ; संजय राऊतांचा धनंजय महाडिकांवर हल्लाबोल

Sanjay Raut on Dhananjay Mahadik : लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये घेणाऱ्या महिला काँग्रेसच्या रॅलीमध्ये दिसल्या तर त्यांचे फोटो काढून घ्या, नावे लिहून घ्या, असे वादग्रस्त वक्तव्य धनंजय महाडिक यांनी केले.

नाशिक : लाडकी बहीण योजनेचे (Ladki Bahin Yojana) पंधराशे रुपये घेणाऱ्या महिला काँग्रेसच्या रॅलीमध्ये दिसल्या तर त्यांचे फोटो काढून घ्या, नावे लिहून घ्या. आपल्या शासनाचे  घ्यायचे आणि त्यांचे गायचे, असे चालणार नाही. अनेक ताया महाराष्ट्रात छाती बडवत आहेत. आम्हाला पैसे नको, आम्हाला सुरक्षा पाहिजे, असे म्हणत आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी केले. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी धनंजय महाडिक यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.  

संजय राऊत म्हणाले की, या भारतीय जनता पक्षाचं फार आदर आणि प्रेम आहे. त्यांनी कुटुंबाला मदत व्हावी, या उदात्त हेतूने योजना सुरु केलेली नाही. ही योजना फक्त तीन महिन्यांसाठी आहे. फक्त निवडणुकीचे मतदान होईपर्यंत ही योजना आहे. त्यामुळे या धमक्या दिल्या जात आहेत की काँग्रेस आणि शिवसेनेच्या रॅलीमध्ये कोणी महिला दिसल्या की त्यांचे फोटो काढा. इतर धमक्याही दिल्या जात आहेत. महिलांना दबावाखाली आणले जात आहे. 

1500 रुपयात मतं विकत घेण्याचा प्रकार

हे फक्त 1500 रुपयात मतं विकत घेण्याचा प्रकार आहे. त्यामुळे आम्ही आमच्या जाहीरनाम्यातील पंचसूत्रीत त्यात आम्ही महिलांसाठी महालक्ष्मी योजना जाहीर केली आहे. तीन हजार रुपये आम्ही महिलांना देऊ. आम्ही कुणाचे फोटो काढणार नाही. ही योजना समस्त महिला वर्गासाठी आहे. मतं द्या किंवा नका देऊ यासाठी या योजना नसतात, महिलांच्या भविष्यासाठी या योजना असतात. 

हा तीन महिन्यांचा खेळ

आमच्या सरकारचा फायदा करून घ्यायचा आणि गुणगान दुसर्‍यांचे गायचे, असे देखील महाडिक यांनी म्हटले. याबाबत संजय राऊत म्हणाले की, सरकार कुणाच्या बापाचे नाही, सरकार जनतेचे असते. आपण कुठल्या पक्षातून कुठे गेलात? किती पक्ष बदलले? यांनी आधी आपला इतिहास बघावा. नरेंद्र मोदी, अमित शाह आणि फडणवीसांच्या घरातून हे पैसे येत नाहीत. जनतेच्या करातील तुम्ही जनतेला देत आहात आणि दादागिरी कोणाला करत आहात? 1500 रुपये तुम्ही देताय, सिलेंडर 1400 रुपयांना मिळत आहे. म्हणून आम्ही महालक्ष्मी योजना तीन हजार रुपयांची करत आहोत. निवडणूक काळात अशा धमक्या महिलांना दिल्या जातील. महिला दुर्लक्ष करताय, त्यांना माहितीये हा तीन महिन्यांचा खेळ आहे. त्यांना महालक्ष्मी योजनेचीच मदत मिळणार आहे. 

आणखी वाचा 

Praniti Shinde: 'लाव रे तो व्हिडिओ...', खासदार धनंजय महाडिकांच्या त्या वक्तव्यावर प्रणिती शिंदे आक्रमक, म्हणाल्या, 'काय बिघडवता आमचं ते...'

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Accident: बाप-लेकीची ती ठरली पहिली अन् शेवटचीच भेट; गावी सुट्टीवर आलेल्या जवानाचा दुर्दैवी अंत, अख्खं गाव हळहळलं!
बाप-लेकीची ती ठरली पहिली अन् शेवटचीच भेट; गावी सुट्टीवर आलेल्या जवानाचा दुर्दैवी अंत, अख्खं गाव हळहळलं!
Nashik Crime News: गोदावरी काठावर संशयास्पद काळी सुटकेस, चेन उघडताच पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली; नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
गोदावरी काठावर संशयास्पद काळी सुटकेस, चेन उघडताच पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली; नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
Nashik Crime News: आठ वर्षांचं प्रेम, लग्न ठरलं, मुलीला प्रियकरासोबत पाठवलं; पण 24 तासांतच असा काही 'गेम' झाला की अख्खा नाशिक जिल्हा हादरला!
आठ वर्षांचं प्रेम, लग्न ठरलं, मुलीला प्रियकरासोबत पाठवलं; पण 24 तासांतच असा काही 'गेम' झाला की अख्खा नाशिक जिल्हा हादरला!
Kalpana Kharat: अशोक खरातच्या पत्नीला मोठा दणका, कल्पना खरातचा अटकपूर्व जामीन फेटाळला; न्यायालयाचे कडक ताशेरे, नेमकं काय घडलं?
अशोक खरातच्या पत्नीला मोठा दणका, कल्पना खरातचा अटकपूर्व जामीन फेटाळला; न्यायालयाचे कडक ताशेरे, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Maharashtra Operation Tiger : ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंच्या गळाला? कोण कुठे आहे? आत्ताची मोठी अपडेट
Raju Waghmare On Operation Tiger Zero Hour : २०२९ पर्यंत उद्धव ठाकरे यांचा पक्ष संपलेला असेल? | Zero Hour
Goras Bhandar FDA Action Wardha: तुकाराम मुंढेंच्या कारवाईला गोरस भंडारचे हायकोर्टात आव्हान
Sudhir Mungantiwar on Opration Tiger : ठाकरेंचे खासदार देशहितासाठी सोबत येत असतील तर स्वागतच - सुधीर मुनगंटीवार
Shahajibapu Patil Solapur: गणेश नाईकांनी शरद पवारांच्या मदतीने सरकार पाडायचा केला होता प्रयत्न

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena : ठाकरेंच्या सहा खासदारांपाठोपाठ एकनाथ शिंदेही दिल्लीच्या दिशेने, लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र देणार, सूत्रांची माहिती
ठाकरेंच्या सहा खासदारांपाठोपाठ एकनाथ शिंदेही दिल्लीच्या दिशेने, लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र देणार, सूत्रांची माहिती
अभिनेत्री संचिताचे उज्ज्वल शर्मासोबतचे चॅट समोर, 3000 रुपये घेतलेले; नातेवाईकांचे आरोप, तोच मुलीला त्रास द्यायचा
अभिनेत्री संचिताचे उज्ज्वल शर्मासोबतचे चॅट समोर, 3000 रुपये घेतलेले; नातेवाईकांचे आरोप, तोच मुलीला त्रास द्यायचा
मंडोळ्या बांधून नटली नवरीबाई; सुप्रिया सुळेंच्या घरी लगीनघाई, वडिलांची लाडाची लेक लवकरच मांडवात
मंडोळ्या बांधून नटली नवरीबाई; सुप्रिया सुळेंच्या घरी लगीनघाई, वडिलांची लाडाची लेक लवकरच मांडवात
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी  733.28 रुपयांचा निधी मंजूर, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी  733.28 रुपयांचा निधी मंजूर, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचं रक्त काढून राज्यातील इतर विभागप्रमुखांना द्या, म्हणजे...; माजी मंत्र्यांचं मुख्य सचिवांना पत्र
तुकाराम मुंढेंचं रक्त काढून राज्यातील इतर विभागप्रमुखांना द्या, म्हणजे...; माजी मंत्र्यांचं मुख्य सचिवांना पत्र
कंगना रणौतचा नवा सिनेमा, 26/11 दहशतवादी हल्ल्याची स्टोरी पुन्हा मोठ्या पडद्यावर; 'भारत भाग्य विधाता' का पाहावा?
कंगना रणौतचा नवा सिनेमा, 26/11 दहशतवादी हल्ल्याची स्टोरी पुन्हा मोठ्या पडद्यावर; 'भारत भाग्य विधाता' का पाहावा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2026 | मंगळवार
आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच चटई अंथरुन रुग्णांवर उपचार; सलाईन नाही अब्रू टांगली, रोहित पवारांकडून फोटो शेअर
आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच चटई अंथरुन रुग्णांवर उपचार; सलाईन नाही अब्रू टांगली, रोहित पवारांकडून फोटो शेअर
Embed widget