'मी पठाण आहे, गोळी घालायची तर घाला', शाहरुख खानला या आधीही मिळाली होती अंडरवर्ल्डची धमकी
Shah Rukh Khan Death Threat : अभिनेता सलमान खानला गेल्या वारंवार लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीकडून धमक्या येत असतानाच आता अभिनेता शाहरुख खानलाही धमकीचा फोन आला आहे.
Shah Rukh Khan Death Threat : सुपरस्टार अभिनेता सलमान खानला गेल्या वारंवार लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीकडून धमक्या येत असतानाच आता अभिनेता शाहरुख खानलाही धमकीचा फोन आला आहे. शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी मिळाली. याप्रकरणी मुंबईच्या वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये कलम 308(4), 351(3)(4) बीएनएस अंतर्गत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, शाहरुख खानला अशी धमकी मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्याला अंडरवर्ल्डकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्याच्यावर दबावही टाकण्यात आला, पण किंग खानने कोणतीही भीती न बाळगता त्या कठीण परिस्थितीचा सामना केला.
शाहरुख खानला आधीही मिळाली होती अंडरवर्ल्डची धमकी
'जवान' चित्रपटाच्या यशाच्या वेळी चित्रपट दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी याबाबत खुलासा केला होता. दिग्दर्शक संजय गुप्ता ट्विटरवर शाहरुख खानचं कौतुक केलं होतं. यावेळी ते म्हणाले होते की, "90 च्या दशकात शाहरुख खान हा एकमेव अभिनेता होता जो अंडरवर्ल्डपुढे झुकला नाही. धमकी देणाऱ्यांना तो म्हणाला होता की, तुला गोळ्या घालायच्या असतील तर घाल, पण मी तुझ्यासाठी काम करणार नाही. मी पठाण आहे. शाहरुख आजही तसाच आहे." असं त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं.
'मला गोळी घालायची तर घाला
पठाण चित्रपटाच्या दिग्दर्शकाशिवाय आणखी एका पुस्तकातही का किस्सा लिहिलेला आहे. संजय गुप्ता व्यतिरिक्त शाहरुख खानच्या अनुपम चोप्राने लिहिलेल्या 'किंग ऑफ बॉलिवूड' या पुस्तकातही या कथेचा उल्लेख आहे. अनुपम चोप्रा यांनी सांगितलं की, शाहरुख खानला अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम, छोटा राजन, छोटा शकील यांचा फोन आला होता. अबू सालेम शाहरुख खानवर त्याच्या जवळच्या मित्रासोबत चित्रपट करण्यासाठी दबाव टाकत होता, पण शाहरुख खानने त्यांचं ऐकलं नाही. यामुळे शाहरुखला शिवीगाळही करण्यात आली होती. शाहरुख खान म्हणाला होता, "मी तुम्हाला कोणाला शूट करायचं हे सांगत नाही, त्यामुळे मी कोणता चित्रपट करायचा हे तुम्ही मला सांगू नका".
अंडरवर्ल्डकडून धमकी, सुरक्षेत वाढ
मीडिया रिपोर्टनुसार, शाहरुख खानला 2014 मध्ये अंडरवर्ल्डकडून धमकी मिळाली होती. शाहरुख खानला अंडरवर्ल्डकडून धोका होता, ज्यानंतर त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. यावेळी मुंबई पोलिसांनी त्याला सुरक्षा पुरवली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :