Sanjay Raut PC Mumbai : लिहून ठेवा, सुप्रिया सुळे विक्रमी मताधिक्क्यानं निवडून येणार : संजय राऊत
Sanjay Raut PC Mumbai : लिहून ठेवा, सुप्रिया सुळे विक्रमी मताधिक्क्यानं निवडून येणार : संजय राऊत
या टप्प्यामध्ये सगळे महत्त्वाचे नेते निवडणूक लढत आहेत. मोदी अमित शहा हे सगळे तिथे भाषण करून गेलेले आहेत.बारामती वर सगळ्यांचे लक्ष होतं. महाराष्ट्रातील लढाई बारामती होते की काय?
काही करून शरद पवार यांचा पराभव करायचा आहे मोदी शहा यांनी ठरवलं. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर महाराष्ट्राचा आधारवड असलेले शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबाचा बारामतीत पराभव करून दाखवून द्यायचं की आम्ही गुजरातच्या व्यापाऱ्यांनी पैशाच्या ताकदीवर, तपास यंत्रणाच्या मदतीने महाराष्ट्राच्या अस्मितेचा पराभव केला... हे त्यांना दाखवून द्यायचे आहे. पण हे शक्य नाही, बारामती ची लढाई महाराष्ट्र स्वाभिमानी आणि अस्मितेची लढाई आहे. बारामती मध्ये सुप्रिया सुळे विक्रमी मतांनी विजयी होत आहे. मला सौ सुनेत्रा पवार यांची दया येते, त्यांच्या पती राजांनी त्यांना बळीचा बकरा करण्याचा प्रयत्न केला.