ABP Majha Headlines : 07 PM : 04 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
धनंजय मुंडेंच्या कार्यकाळात कृषिखात्यात पावणे तीनशे कोटींचा घोटाळा, अंजली दमानियांचा गंभीर आरोप...दमानियांचा बदनामिया उल्लेख करत मुंडेंचा पलटवार...दमानियांविरोधात करणार खटला दाखल...
धनंजय मुंडेंच्या कृषिमंत्रीपदाच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनेच राजरोस भ्रष्टाचार, दमानियांचा आरोप, जीआरवरच्या अजित पवार आणि फडणवीसांच्या सहीवर बोट
नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज मस्साजोगमध्ये...देशमुख कुटुंबीयांचं सांत्वन आणि चर्चा, नारायणगडावर देशमुखांची भेट न झाल्याने महाराज स्वतःच देशमुखांच्या घरी
मुख्यमंत्र्याच्या वर्षा बंगल्यात रेड्याची मंतरलेली शिंगे पुरल्याची चर्चा, संजय राऊतांचा आरोप, शपथविधीच्या अनेक दिवसानंतरही फडणवीस वर्षावर राहायला का जात नाहीत, संजय राऊतांचा सवाल
मुंबई महापालिकेतील कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी सूरज चव्हाणांची जामिनावर सुटका, सुटका होताच मातोश्रीवर दाखल...आदित्य ठाकरेंना कडकडून भेट झाले भावूक...
शिवाजी महाराज आग्र्यातून लाच देऊन सुटले, अभिनेते राहुल सोलापूरकर यांचं वादग्रस्त वक्तव्य...पुण्यात सोलापूरकरांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन...
पीकविमा घोटाळ्याच्या चौकशीची सुप्रिया सुळेंची लोकसभेत मागणी, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहानांचा सकारात्मक प्रतिसाद, कठोर कारवाईचं आश्वासन
ज्यांच्या घरात जॅकुझी आहे ते झोपड्यांत जाऊन फोटोसेशन करतात, लोकसभेत,पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींना टोला...तर अरविंद केजरीवालांवर शिशमहल घोटाळ्यावरून हल्लाबोल...






















