एक्स्प्लोर
Pune Accident News: भरधाव वेगात जाणाऱ्या BMW कारने घेतला अचानक पेट; आलिशान गाडी आगीत भस्मसात, पिंपरी चिंचवडमधील घटना
Pune Accident News: पुणे जिल्ह्याच्या पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरात एका बीएमडब्लु (BMW) या आलिशान भरधाव वेगात जाणाऱ्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे.

Pune Accident News
1/7

पुणे जिल्ह्याच्या पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरात एका बीएमडब्लु (BMW) या आलिशान भरधाव वेगात जाणाऱ्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे.
2/7

यातील बीएमडब्लु (BMW) कार चालक सयाजी हॉटेल जवळून पुणे शहराकडे जाणाऱ्या सर्विस रोडने जात असताना हा अपघात झाला आहे.
3/7

वाकड परिसरात कारने अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
4/7

मात्र कारचालकाने वेळीच आपली कार भर रस्त्यात थांबवून, कारमधून बाहेर पडल्याने त्याचा जीव सुदैवाने वाचला आहे.
5/7

कारला आग लागल्याची माहिती पिंपरी-चिंचवड शहर अग्निशमन दलाला मिळताच, अग्निशमन दलाने घटनास्थळी तातडीने पोहचून कारला लागलेली आग आटोक्यात आणली आहे.
6/7

मात्र रस्त्यावरून भरधाव वेगात जाणाऱ्या BMW कारणे नेमकं कशामुळे पेट घेतला? हे अजून स्पष्ट झालेलं नाही.
7/7

यावेळी बघ्यांनी मात्र एकच गर्दी केली होती.
Published at : 04 Feb 2025 07:21 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion