एक्स्प्लोर
Yavatmal Accident News : एसटी बसची दुचाकीला धडक; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, तर 68 प्रवाशी मात्र....
Yavatmal Accident News : यवतमाळ- किनवट या एसटी बसने एक दुचाकीला धडक दिली असून एसटीच्या या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे.

Yavatmal Accident News
1/6

यवतमाळ जिल्ह्यातून एक अपघाताची बातमी समोर आली असून यात यवतमाळ- किनवट बसला भीषण अपघात झाला आहे.
2/6

यवतमाळ- किनवट या एसटी बसने एक दुचाकीला धडक दिली असून एसटीच्या या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे.
3/6

तर एसटी मधील 68 प्रवाशी किरकोळ जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे.
4/6

यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील माणोली ते दहेगाव परिसरात ही घटना घडली आहे. किनवट वरून घाटंजीमार्गे यवतमाळकडे येणाऱ्या एसटी बसला हा अपघात झाला आहे.
5/6

एसटी बसच्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून मृतकाचे नाव नंदू चव्हाण असून तो जळका तालुका राळेगाव येथील रहिवासी असल्याचे पुढे आले आहे.
6/6

समोरून येणार्या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या नादात बस रस्त्याच्या खाली घसरली असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. तर जखमींना घाटंजी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.
Published at : 04 Feb 2025 06:47 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
विश्व
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
