एक्स्प्लोर

Abhijit Panse on Konkan MLC : मनसेचे उमेदवार की महायुतीचे? अभिजीत पानसे स्पष्टच बोलले! ABP Majha

Vidhan Parishad Election 2024 : मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (Maharashtra Navnirman Sena) कोकण पदवीधरसाठी उमेदवार रिंगणात उतरवला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेकडून अभिजीत पानसे (Abhijit Panse) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्वीट करत यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. 

मनसेनं केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार, महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. अभिजित पानसे यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे."

अभिजीत पानसेंना कोकण पदवीधरसाठी उमेदवारी जाहीर, पण मनसेची की, महायुतीची? 

कोकण पदवीधरमधून मनसेने अभिजीत पानसेंना उमेदवारी जाहीर केली. मात्र, आता पानसेंची उमेदवारी ही मनसेची की महायुतीची? असा सवाल उपस्थित झाला आहे. कोकण पदवीधरमधून डावखरे हे भाजपचे आमदार आहेत. त्यांचा कार्यकाळ संपतोय आणि त्याच जागेवर मनसेकडून अभिजीत पानसेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता ही उमेदवारी मनसेची की महायुतीची? असा सवाल उपस्थित झाला आहे. कोकण पदवीधरसाठी येत्या 26 जून रोजी मतदान होणार आहे. तर 1 जुलैला मतमोजणी होणार आहे.  

अभिजीत पानसे कोण? 

मनसे नेते अभिजीत पानसे हे प्रसिद्ध सिनेलेखक आणि दिग्दर्शक आहेत. 2014 मध्ये पानसेंनी दिग्दर्शित केलेल्या रेगे चित्रपटाला प्रेक्षकांकडून मोठी दाद मिळाली होती. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आयुष्यावर आधारित ठाकरे सिनेमाची निर्मिती खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्यावेळी बाळासाहेबांचं आयुष्य रुपेरी पडद्यावर साकार करण्यासाठी संजय राऊतांनी अभिजीत पानसेंची निवड केली. अभिजीत पानसे दिग्दर्शित ठाकरे सिनेमा महाराष्ट्रासह देश-विदेशात प्रचंड गाजला. शिवसेनेत असताना भारतीय विद्यर्थी सेनेची धुरा अभिजीत पानसे यांच्या खांद्यावर होती. मात्र, नंतर आदित्य ठाकरेंच्या लॉन्चिंगसाठी बाळासाहेबांकडून युवासेना स्थापन करण्यात आली आणि शिवसेनेच्या विद्यार्थी सेनेचं विलीनीकरण युवासेनेत झालं. मग नाराज पानसे यांनी मनसेची साथ देण्याचा निर्णय घेतला. अभिजित पानसे सिनेमाव्यतिरिक्त राजकारणातही सक्रिय असतात. पानसे यांनी मनसेच्या चित्रपट सेनेची जबाबदारी सांभाळलेली आहे. राज ठाकरेंच्या निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जातात. अभिजीत पानसे यांनी 2014 मध्ये लोकसभा निवडणूकही लढवली होती. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Nitin Gadkari Pune Speech : राजाविरुद्ध कितीही बोलले तरी ते राजाने सहन करावे
Nitin Gadkari Pune Speech : राजाविरुद्ध कितीही बोलले तरी ते राजाने सहन करावे

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत; शिवसेना आमदाराचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'स्वप्नाला...'
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत; शिवसेना आमदाराचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'स्वप्नाला...'
Kisan Rail : बंद झालेली किसान रेल पुन्हा सुरु करा, खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची रेल्वेमंत्र्यांकडं मागणी 
बंद झालेली किसान रेल पुन्हा सुरु करा, खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची रेल्वेमंत्र्यांकडं मागणी 
Amit Shah : अमित शाह 25 सप्टेंबरला नाशिक दौऱ्यावर; नाथाभाऊंच्या भाजप प्रवेशाचा निर्णय होणार? नेमकं काय आहे कारण?
अमित शाह 25 सप्टेंबरला नाशिक दौऱ्यावर; नाथाभाऊंच्या भाजप प्रवेशाचा निर्णय होणार? नेमकं काय आहे कारण?
मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले, विद्यापीठ राजकीय दबावाला बळी, अमित ठाकरेंची टीका
मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले, विद्यापीठ राजकीय दबावाला बळी, अमित ठाकरेंची टीका
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Nitin Gadkari Pune Speech : राजाविरुद्ध कितीही बोलले तरी ते राजाने सहन करावेAmitabh Bachchan Apology : मराठी शब्दाचा चुकीचा उच्चार, अमिताभ बच्चन यांनी माफी मागितलीMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 21 September 2023 : ABP MajhaTop 70 : सातच्या 70 बातम्या! वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत; शिवसेना आमदाराचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'स्वप्नाला...'
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत; शिवसेना आमदाराचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'स्वप्नाला...'
Kisan Rail : बंद झालेली किसान रेल पुन्हा सुरु करा, खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची रेल्वेमंत्र्यांकडं मागणी 
बंद झालेली किसान रेल पुन्हा सुरु करा, खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची रेल्वेमंत्र्यांकडं मागणी 
Amit Shah : अमित शाह 25 सप्टेंबरला नाशिक दौऱ्यावर; नाथाभाऊंच्या भाजप प्रवेशाचा निर्णय होणार? नेमकं काय आहे कारण?
अमित शाह 25 सप्टेंबरला नाशिक दौऱ्यावर; नाथाभाऊंच्या भाजप प्रवेशाचा निर्णय होणार? नेमकं काय आहे कारण?
मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले, विद्यापीठ राजकीय दबावाला बळी, अमित ठाकरेंची टीका
मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले, विद्यापीठ राजकीय दबावाला बळी, अमित ठाकरेंची टीका
Ajit Pawar: 'भाजप मावळमध्ये घड्याळाला नाही तर तुतारीला मदत करणार', राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराचा गौप्यस्फोट, नेमकं काय म्हणाले?
'भाजप मावळमध्ये घड्याळाला नाही तर तुतारीला मदत करणार', राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराचा गौप्यस्फोट, नेमकं काय म्हणाले?
Maharashtra weather : आज कसं असेल राज्यातील हवामान? कुठं कुठं पडणार पाऊस, वाचा हवामान विभागाचा अंदाज
आज कसं असेल राज्यातील हवामान? कुठं कुठं पडणार पाऊस, वाचा हवामान विभागाचा अंदाज
Ajit Pawar: पिंपरी मतदारसंघासाठी महायुतीचे तिन्ही पक्ष आग्रही! अजितदादा गटाचा प्रचार न करण्याचा ठराव, भाजपचा राष्ट्रवादीला विरोध
पिंपरी मतदारसंघासाठी महायुतीचे तिन्ही पक्ष आग्रही! अजितदादा गटाचा प्रचार न करण्याचा ठराव, भाजपचा राष्ट्रवादीला विरोध
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकच्या जागांवरून महायुतीपाठोपाठ मविआतही बिघाडी? शरद पवार गटाचा थेट 10 जागांवर दावा
नाशिकच्या जागांवरून महायुतीपाठोपाठ मविआतही बिघाडी? शरद पवार गटाचा थेट 10 जागांवर दावा
Embed widget