एक्स्प्लोर
Pune Politics: 'धंगेकर केवळ मोहरे, बोलविते धनी सरकारमध्येच', Sanjay Raut यांचा गंभीर आरोप
पुण्यातील जैन बोर्डिंग (Jain Boarding) जमिनीच्या वादामुळे महायुतीमध्ये (Mahayuti) राजकीय तणाव निर्माण झाला आहे. शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 'धंगेकर हे केवळ मोहरे आहेत, त्यांचे बोलविते धनी सरकारमध्येच आहेत,' असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. दुसरीकडे, 'काहीही किंमत मोजावी लागली तरी मी लढणार,' असे म्हणत धंगेकर यांनी माघार घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. आपल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) कारवाई करणार नाहीत, असा विश्वासही धंगेकरांनी व्यक्त केला आहे. या आरोप-प्रत्यारोपांमुळे शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) या मित्रपक्षांमध्ये आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघर्ष पेटला आहे. शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी मध्यस्थीचे संकेत दिले असले तरी हा वाद शमण्याची चिन्हे दिसत नाहीत.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















