Prithviraj Chavan : फडणवीसांचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...
काल केंद्र सरकराने कांदा आणि बासमती राईस यावरचा किमान निर्यात शुल्क काढला
केंद्र सरकारने काल शेती उत्पादनाच्या वर निर्णय घेतले आहेत. कांदा आणि बासमती रईस बाबत निर्णय झाला आहे. किमान निर्यात शुल्क कमी केलं आहे. हरियाणा मध्ये बासमती तांदूळ मोठ्या प्रमाणत होतों. कांदा आणि बासमती तांदूळ यावर निर्यात शुल्क कमी करण्याचास निर्णय घेतला आहे
कांद्या वरील निर्यात शुल्क 40 टक्क्यावरून 20 टक्क्यांवर आणल आहे.
विधानसभेला दारूण पराभव समोर दिसत आहे म्हणुन यांनी निर्णय घेतला आहे. हे राजकिय निर्णय आहेत. नरेन्द्र मोदी यांना 3 कृषि विधेयक मागे घ्यायला लावली त्यामुळें त्याचा सुड काढताना पहिला मिळत आहे
शेतकऱ्यांची मुलं म्हणणारे राज्याचें मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी कधीच केंद्र सरकारला चार ओळीच पत्र लिहिलं नाही.
राज्यांत सोयाबीन पीक काढायला आलं आहे. सोयाबीनला 6 हजार भाव द्या अशी मागणी आहे. स्वतः पाशा पटेल जे सरकार मध्ये आहेत त्यांनी देखील हीच मागणी केली होती