Nitesh Rane : संजय राऊत अण्णा हजारेंना घोटाळ्यांची आठवण करुन देत होते, नितेश राणेंचा हल्लबोल
Nitesh Rane : संजय राऊत अण्णा हजारेंना घोटाळ्यांची आठवण करुन देत होते, नितेश राणेंचा हल्लबोल
संजय राऊत अण्णा हजारेंना काही घोटाळ्यांची आठवण करुन देत होते. त्यांनी अजून काही घोटाळ्यांवर लक्ष घालावं अशी वेळ त्यांच्यावर आली आहे मग त्यांना खिचडी घोटाळा व पत्राचाळ घोटाळ्यावर लक्ष घालायला सांगितले पाहिजे कोविड मधल्या घोटाळ्यावर लक्ष घालावं हे बोलले तर वाईट नाही. उद्धव ठाकरेंनी अहकांर दाखवायचा उच्चांक अडीच वर्षात गाठला. आणि आर एस एस ला शिकवणे आणि सल्ला देणे हा भांडूपचा देवानंद एवढा मोठा ननाही. कारण तुम्हांला पण हिंदुत्वाबद्सल संघाने सल्ले दिले होते. तुमच्या बुडाखाली किती आग लागली आहे याचा अंदाज घ्या. फडणवीसांना खलनायक बोलतात तुला आम्ही राजकारणाचा जोकर मानतो. तु त्यांना कलिनाच्या हयात हाॅटेल मध्ये का भेटायला गेला होता. मातोश्री दोन च्या परवानग्या हव्या होत्या तेव्हा फडणवीस खलनायक आहेत हे वाटल नाही का काँग्रेसच्या तुकड्यावर जगणारे तुम्ही लोक, तुम्ही राजकारणातले जोकर झाले आहेत. संजय राउत व त्याचा मालक व पवार साहेबांशी कोणती गँग आहे? बेवडा गँग की गांजा गॅग ? तुझा मालक मुकेश अंबानीच्या मुलाच्या लग्नात काय करतो? ? तिकडे फुकटाचं खाण खायला का जातो? सर्व फुकट घ्यायला गुजराती समाज चालतो?