(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Wardha Bhugaon Factory Accident : वर्ध्यात भुगावमधील एवोनिथ कंपनीत स्फोट, 22 कामगार जखमी
Wardha Bhugaon Factory Accident : वर्ध्यात भुगावमधील एवोनिथ कंपनीत स्फोट, 22 कामगार जखमी
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
भुगाव येथील इवोनिथ स्टील कंपनीत स्लॅकपीटमध्ये ब्लास्ट झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. यात २२ कामगार भाजले आहेत.
ही घटना बुधवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली असून जखमींना तातडीने सावंगीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. लोखंड निर्मितीचा कारखाना असलेल्या इवोनिथ लॉजिस्टीक स्टीलमध्ये नियमित काम सुरू असताना स्लॅकपीटचा पाण्यासोबत संबंध येऊन गॅस तयार झाल्याने भडका उडाला. स्फोट झाल्याने आजुबाजुला असलेले २२ कामगार भाजले. यातील तीन कामगार जास्त भाजल्याने त्यांना तातडीने नागपुरला हलविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
जवळपास १९ कामगारांना सावंगीच्या आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच कंपनी प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरु केल्या. जखमींच्या प्रकृतीची काळजी कंपनी पूर्णपणे घेणार असून कंपनी सर्वतोपरी मदत करणार आहे. अद्यापही जखमींची नावे आणि अधिकृत संख्या कळू शकली नाही.