एक्स्प्लोर

फडणवीसजी, तुम्ही स्वयंसेवक काळी टोपी घालून कोणाचा निषेध करता? सचिन खरात यांचा पलटवार, नेमकं काय आहे प्रकरण?

Sachin Kharat on Devendra Fadnavis : राहुल गांधी एक पुस्तक आपल्याला दाखवतात. संविधानाचा सन्मानच केला पाहिजे. पण लाल संविधानच का? तुम्ही कोणाला इशारा देताय?, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.

मुंबई : लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे काल महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. विधानसभा निवडणुकीचे रणशिंग त्यांनी नागपूरमधून (Nagpur) फुंकले. मात्र राहुल गांधी यांच्या महाराष्ट्र दौऱ्याआधी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. राहुल गांधी एक पुस्तक आपल्याला दाखवतात. संविधानाचा सन्मानच केला पाहिजे. पण लाल संविधानच का? कोणाला तुम्ही इशारा देताय? लाल पुस्तक दाखवून कोणाला इशारा देताय? संविधानाचा अर्थ असतो ऑर्डर. तुम्ही अराजक पसरवत आहात, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. आता यावरून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (सचिन खरात गट) राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात (Sachin Kharat) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केलाय. 

तुम्ही स्वयंसेवक काळी टोपी घालून कोणाचा निषेध करता?

सध्या काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी देशात संविधान सन्मान संमेलन घेत आहेत. या माध्यमातून संविधान काय आहे, संविधानाने प्रत्येक नागरिकाला काय दिले, याबाबत राहुल गांधी सांगत आहेत. परंतु यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, लाल संविधान कोणाला दाखवता, अहो फडणवीसजी संविधान सर्वधर्म समभाव मानते. परंतु, तुम्ही स्वयंसेवक काळी टोपी घालून कोणाचा निषेध करता? हे भारतीय जनतेला सांगा, असे म्हणत सचिन खरात यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केलाय.

नेमकं काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस? 

भारत जोडो हा समूह तयार करण्यात आला आहे. या समूहामध्ये अनेक संघटना अतिशय डाव्या विचारांच्या आहेत. त्यांच्या कामाची पद्धत, ध्येय धोरणे ही अराजक पसरवणारी यंत्रणा आहे. एकीकडे राहुल गांधी एक पुस्तक आपल्याला दाखवतात. संविधानाचा सन्मानच केला पाहिजे. पण लाल संविधानच का? कोणाला तुम्ही इशारा देताय? लाल पुस्तक दाखवून कोणाला इशारा देताय? संविधानाचा अर्थ असतो ऑर्डर. तुम्ही अराजक पसरवत आहात. राहुल गांधी यांची नागपुरात संविधान सभा होणार असली तरी खोट्याचे वय अत्यंत अल्प असते. लोकसभा निवडणुकीच्या काळात पसरवलेला भ्रम आता दूर झाला आहे. राहुल गांधी आणि काँग्रेसचे नाटक जनता आता चालू देणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : शिवाजी महाराज म्हटलं की यांच्या अंगाची लाही लाही होते, देवा भाऊ जाऊ तिथे खाऊ : उद्धव ठाकरे

Udayanraje Bhosale : देवेंद्रजी एवढं काम करत असताना त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येतात, त्यांच्या पाठिशी उभं राहायला पाहिजे : उदयनराजे भोसले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभाAaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Embed widget