एक्स्प्लोर

Nashik Girna River Rescue : नदी पात्रात अडकलेल्या मासेमारांची सुटका; सुटकेनंतर पहिली प्रतिक्रिया

Nashik Girna River Rescue : नदी पात्रात अडकलेल्या मासेमारांची सुटका; सुटकेनंतर पहिली प्रतिक्रिया जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस (Heavy Rain) बरसत आहे. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. नाशिकच्या सात धरणांमधून सध्या विसर्ग सुरु असल्याने नद्यांना पूर आल्याचे चित्र आहे. त्यातच रविवारी गिरणा नदीच्या (Girna River) पाण्यात मासे पकडायला गेलेले 12 जण अडकल्याची घटना घडली. नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने हे 12 जण तब्बल 15 तासांहून अधिक कालावधी उलटूनही नदीपात्रातून अडकले होते. आता या 12 जणांना लष्कराच्या हेलिकॉप्टरद्वारे (Helicopter) बाहेर काढण्यात आले आहे. यामुळे नदीत अडकलेल्या 12 जणांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.    जिल्ह्यातील मालेगाव (Malegaon) येथील गिरणा नदीच्या पुरात अडकलेल्या 12 जणांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. हे सर्वजण अजूनही पुराच्या पाण्यातच अडकलेले होते. त्यांनी संपूर्ण रात्र खडकावर बसून काढली आहे. सध्या नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस (Nashik Rain Update)  सुरु असल्याने गिरणा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. यामुळे पुरात अडकलेल्या 12 जणांना वाचवण्यासाठी अडचणी येत होत्या.   12 तरुणांना हेलिकॉप्टरद्वारे बाहेर काढले तब्बल 15 तासांहून अधिक कालावधी उलटूनही 12 जणांना अद्याप नदीपात्रातून सुखरूप बाहेर काढता आलेले नव्हते. मनपा प्रशासन, अग्निशमन दल, एसडीआरएफ (SDRF) जवानांचे या 12 जणांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. नदीपात्रातील पाण्याच्या प्रवाह जास्त असल्याने तरुणांना बाहेर काढण्यास अडथळे निर्माण होत होता. नाशिकच्या जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse), आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद (Maulana Mufti Mohammad) हे परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. अडकलेल्या तरुणांना जेवण पोहचवण्यात आले. दरम्यान, अशा आपत्कालीन परिस्थितीत आता हेलिकॉप्टरची मदत घेवून 12 जणांना बाहेर काढण्यात येणार असल्याची माहिती मालेगाव महापालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव यांनी दिली होती. नुकतीच या 12 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया
Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget