Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा 26 ऑगस्टला कोसळला. या दुर्घटनेप्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीने 16 पानी अहवाल, राज्य सरकारकडे सादर केला आहे. गंज, कमकुवत फ्रेम आणि चुकीच्या वेल्डिंगमुळे शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचं या अहवालात नमुद करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करताना, त्याची डिझाईन योग्य पद्धतीने तयार केली नसल्याचंही अहवालात उल्लेख आहे.
भारतीय नौदलाचा वीस वर्षांहून अधिक अनुभव असलेले कमोडोर पवन धिंग्रांच्या अध्यक्षतेखाली, पाच सदस्य समितीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, बांधकाम विभागाचे माजी मुख्य अभियंता विकास रामगुडे, आयआयटीचे प्रा. जांगिड, प्रा. परिदा यांचा समावेश होता. दरम्यान हा अहवाल आल्यानंतर, राज्य सरकार दोषींवर नक्की कारवाई करेल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.