MVA Vidhansabha Election : तिढा असलेल्या जागांवर काँग्रेस - ठाकरे गटाच्या बैठकीनंतर शिक्कामोर्तब
MVA Vidhansabha Election : तिढा असलेल्या जागांवर काँग्रेस - ठाकरे गटाच्या बैठकीनंतर शिक्कामोर्तब
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) शिवसेना ठाकरे गटाची (Shiv Sena UBT) येत्या दोन ते तीन दिवसात उमेदवारांची पहिली यादी (Shiv Sena Candidate List) जाहीर होणार आहे. पहिल्या यादीमध्ये साधारणपणे 60 ते 70 उमेदवार जाहीर केले जाऊ शकतात. यामधील बहुतांश उमेदवारांना तयारी करण्याचे आदेश पक्षाकडून देण्यात आले आहेत तर काहीजणांना लवकर एबी फॉर्म घेऊन जाण्याचे सुद्धा सांगितले गेले आहे.
ज्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे अशा 32 जणांच्या संभाव्य उमेदवारांची माहिती एबीपी माझाला मिळाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे 32 संभाव्य उमेदवार ज्यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. यातील दोन ते तीन उमेदवारांसंदर्भात पुनर्विचार चालू आहे. जिथे येत्या दोन दिवसात निर्णय घेऊन उमेदवारी जाहीर केली जाईल.