एक्स्प्लोर

Maharashtra Assembly Elections 2024 : अनिल पाटलांचं टेन्शन वाढलं, अमळनेर विधानसभा मतदारसंघातून बड्या नेत्याने ठोकला शड्डू!

Amalner Assembly constituency : मंत्री अनिल पाटील यांच्या विरोधात बड्या नेत्याने विधानसभेसाठी शड्डू ठोकलाय. यामुळे अनिल पाटील यांचे टेन्शन वाढल्याचे बोलले जात आहे.

जळगाव : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे (Maharashtra Assembly Elections 2024) बिगुल अखेर वाजले आहे. राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सामना रंगणार आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली जात आहे. अनेक इच्छुक उमेदवार तिकिटासाठी फिल्डिंग लावत असल्याचे चित्र आहे. त्यातच आता मंत्री अनिल पाटील (Anil Patil) यांच्या विरोधात बड्या नेत्याने विधानसभेसाठी शड्डू ठोकलाय. 

2019 च्या निवडणुकीत भाजपाकडून उमेदवारी मिळून सुद्धा पराभव पत्करावा लागलेल्या अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी (Shirish Chaudhary) यांनी 2024 ची निवडणूक मंत्री अनिल पाटील यांच्या विरोधात अपक्ष लढविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अनिल पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

शिरीष चौधरी यांनी ठोकला विधानसभेसाठी शड्डू

2014 साली देशात पंतप्रधान मोदी यांची लाट असताना ही अमळनेर येथील शिरीष चौधरी हे अपक्ष निवडणूक लढून सुधा मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी भाजपसोबत राहून 2019 ची निवडणूक ही भाजपच्या तिकिटावर लढविली होती. यावेळी मात्र त्यांचा मंत्री अनिल पाटील यांनी पराभव केला होता. या पराभवाचे उत्तर देण्यासाठी माजी आमदार शिरीष चौधरी यांनी भाजपचे सहयोगी सदस्य असताना ही भाजपा किंवा अन्य कोणत्याही पक्षाचे तिकीट न घेता अपक्ष निवडणूक लढवून मंत्री अनिल पाटील यांच्या विरोधात रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. 

...म्हणून अपक्ष निवडणूक लढवणार

येत्या 28 ऑक्टोबर रोजी ते आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. अपक्ष निवडणूक लढविली तर सगळ्याच पक्षातील लोकांचा आणि नाराज उमेदवारांचा आपल्याला फायदा होऊ शकतो आणि त्यातून आपल्याला मागील काळात विजय मिळाला तसा याही वेळी मिळू शकेल, असा विश्वास असल्याने आपण अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचं शिरीष चौधरी यांनी म्हटले आहे.

राजकीय वातावरण तापलं

मंत्री अनिल पाटील यांनी आपल्या मंत्री पदाच्या काळात कोणतेही ठोस विकासकामे केले नाहीत. या उलट आपण आमदार असताना जास्तीचा निधी आणून जनतेची कामे केल्याचा दावा शिरीष चौधरी यांनी केला आहे.  मंत्री अनिल पाटील यांचे आपल्यासाठी मोठे आव्हान नाही. आपण केलेल्या विकास कामावर जनता आपल्याला निवडून देईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय. यामुळे अमळनेर विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापल्याचे दिसून येत आहे. 

आणखी वाचा 

North Maharashtra MLA List : उत्तर महाराष्ट्रात कोणत्या पक्षाची किती ताकद? सर्व आमदारांची यादी वाचा एका क्लिकवर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Embed widget