एक्स्प्लोर

Maharashtra Assembly Elections 2024 : मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरमध्ये मविआचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोणत्या पक्षाला किती जागा? जाणून घ्या

Mahavikas Aghadi Seat Sharing : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नऊ जागांबाबत महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर येत आहे. 

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे (Maharashtra Assembly Elections 2024) बिगुल वाजल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) लढत होणार असून सर्वच राजकीय पक्ष आता जोमाने तयारीला लागले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीत सध्या जागा वाटपावर चर्चा सुरु आहे. त्यातच आता छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातील महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर येत आहे. 

यंदा महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. त्यातच आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर आला आहे. 

असा आहे जागा वाटपाचा फॉर्म्युला

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नऊ जागांपैकी शिवसेना ठाकरे गट सहा जागा, काँग्रेस दोन तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला एक जागा मिळाल्याची माहिती समोर येत आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना वैजापूर, पैठण, कन्नड, औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम आणि सिल्लोड या जागा लढवेल. काँग्रेस फुलंब्री आणि औरंगाबाद पूर्व तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गंगापूरची जागा मिळाली आहे. 

ठाकरे गटाचे पाच उमेदवार फिक्स? 

दरम्यान, काल ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत झालेल्या बैठकीत छत्रपती संभाजीनगरमधून पाच उमेदवार जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे. या पाचही उमेदवारांना तयारी करण्याचे पक्षांकडून आदेश देण्यात आले आहेत. पुढच्या दोन दिवसात एबी फॉर्म मिळतील. अर्ज दाखल करण्याची तयारी करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. तर काँग्रेस आणि शरद पवार गटात नेमकी कुणाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात कोण?   

  • औरंगाबाद पश्चिम- राजू शिंदे (ठाकरे सेना)
  • औरंगाबाद मध्य- किशचंद तनवाणी (ठाकरे सेना)
  • वैजापूर- दिनेश परदेशी (ठाकरे सेना)
  • कन्नड- उदय सिंग राजपूत (ठाकरे सेना)
  • पैठण- अजून उमेदवार ठरला नाही.
  • सिल्लोड- सुरेश बनकर (ठाकरे सेना)
  • गंगापूर -राष्ट्रवादी शरद पवार सतीश चव्हाण उमेदवार असण्याची शक्यता मात्र अधिकृत अजून घोषणा नाही.
  • औरंगाबाद पूर्व - काँग्रेस अजून उमेदवार ठरला नाही.
  • फुलंब्री - काँग्रेस अजून उमेदवार ठरला नाही.   

महायुतीचे जागावाटप कसे? 

छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेला सहा, भाजपाला तीन जागा मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर अजित पवार गटाला छत्रपती संभाजीनगरमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. शिवसेनेकडे औरंगाबाद पश्चिम, औरंगाबाद मध्य, पैठण, कन्नड, वैजापूर आणि  सिल्लोड हे मतदारसंघ येणार असल्याचे समजते. 

महायुतीचे उमेदवार कोण? 

  • औरंगाबाद पश्चिम - संजय शिरसाट.
  • औरंगाबाद मध्य - प्रदीप जयस्वाल.
  • वैजापूर - रमेश बोरणारे.
  • पैठण - विलास भुमरे.
  • सिल्लोड -अब्दुल सत्तार.
  • कन्नड - अजून उमेदवार ठरला नाही.
  • औरंगाबाद पूर्व - अतुल सावे.
  • गंगापूर - प्रशांत बंब.
  • फुलंब्री- अजून उमेदवार ठरला नाही. मात्र अनुराधा चव्हाण यांची अधिक शक्यता. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

मोठी बातमी! महायुतीतील जागावाटप जवळपास पूर्ण, आता फक्त मोजक्याच जागांचा प्रश्न; अमित शाहांच्या उपस्थितीत तिढा सुटला?

महाविकास आघाडीत मोठी बिघाडी; नाना पटोले असल्यास बैठकीला उपस्थित राहणार नाही, ठाकरेंच्या शिवसेनेचा इशारा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
Bangladesh BNP Protest : बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM : 11 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Superfast News :  11 December 2024  : दिवसभरातील सुपरफास्ट बातम्या : ABP MajhaMaharashtra Beauty Parlour And Salon Rates : नव्या वर्षात सलून आणि ब्युटी पार्लरचा खर्च वाढणारMaharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तारावर महायुतीच्या नेत्यांची उद्या मुंबईत बैठक- सूत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
Bangladesh BNP Protest : बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार
Pushpa 2: The Rule : 'गंगम्मा जतारा' म्हणजे नेमकं आहे तरी काय? पुष्पा 2 मध्ये फक्त सहा मिनिटांचा सीन अन् तब्बल 60 कोटींचा चुराडा!
'गंगम्मा जतारा' म्हणजे नेमकं आहे तरी काय? पुष्पा 2 मध्ये फक्त सहा मिनिटांचा सीन अन् तब्बल 60 कोटींचा चुराडा!
बाप रे... 9 महिन्यात 18 हजार पुणेकरांना चावले भटके कुत्रे; महापालिका म्हणतेय नोंदणी ऑनलाईन
बाप रे... 9 महिन्यात 18 हजार पुणेकरांना चावले भटके कुत्रे; महापालिका म्हणतेय नोंदणी ऑनलाईन
Best Bus Accident: मोठी बातमी! मुंबईच्या CSMT रेल्वे स्थानकाजवळ बेस्ट बसनं आणखी एकाला चिरडलं
मोठी बातमी! मुंबईच्या CSMT रेल्वे स्थानकाजवळ बेस्ट बसनं आणखी एकाला चिरडलं
Embed widget