एक्स्प्लोर

रश्मी बर्वेंना 'सर्वोच्च' दिलासा; जात वैधता प्रमाणपत्र रद्द करणं बेकायदा; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

Rashmi Barve : राज्यात विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. निवडणुकीच्या तोंडावर असताना जात प्रमाणपत्र रद्द केल्यामुळे रश्मी बर्वे यांनी नागपूर खंडपीठात दाद मागितली होती.

Rashmi Barve : काँग्रेस (Congress) नेत्या रश्मी बर्वे (Rashmi Barve) यांना जात वैधता प्रमाणपत्रासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) दिलासा मिळाला आहे. रश्मी बर्वे यांचं प्रमाणपत्र रद्द करणं बेकायदा असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. रशमी बर्वे यांच्या जात वैधता प्रमाणपत्राविरोधात (Caste Validity Certificate) राज्य सरकारनं अनुमती याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयानं ही याचिका फेटाळत रश्मी बर्वे यांना दिलासा दिला आहे. 

राज्यात विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. निवडणुकीच्या तोंडावर असताना जात प्रमाणपत्र रद्द केल्यामुळे रश्मी बर्वे यांनी नागपूर खंडपीठात दाद मागितली होती. त्यावर उच्च न्यायालयानं त्यांना क्लीन दिली आहे. तसेच, त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द करणं चुकीचं ठरवलं होतं. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सरकारनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारची अनुमती याचिका फेटाळली असून नागपूर खंडपीठानं दिलेला निर्णय कायम ठेवला आहे.

खंडपीठाच्या निर्णयाविरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात 

रश्मी बर्वेंना जात वैधता प्रमाणपत्रासंदर्भातील सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारवर ताशेरे देखील ओढले आहेत. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं 28 मार्च 2024 रोजी बर्वे यांचं अनुसूचित जातीचे वैधता प्रमाणपत्र रद्द केलं होतं. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं हा निर्णय रद्द करत, समितीला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारच्या वतीनं विशेष अनुमती याचिका दाखल केली होती. या प्रकरणातील याचिकेनुसार, जिल्हा जात पडताळणी समितीनं पारशिवनी तालुक्यातील गोडेगाव टेकाडी येथील वैशाली देविया यांच्या तक्रारीची दखल घेऊन 28 मार्च रोजी बर्वे यांचं प्रमाणपत्र रद्द केलं होतं. 

लोकसभा निवडणूक लढवू शकल्या नव्हत्या रश्मी बर्वे

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2024 होती. त्यामुळे बर्वे यांनी वेळेत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला. हा अर्ज दाखल करताना त्यांनी रामटेकमध्ये मोठं शक्तीप्रदर्शन केलं होतं. मात्र, अर्ज दाखल केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जात वैधता पडताळणी समितीनं बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द ठरवलं होतं. त्यामुळे काँग्रेसपुढे मोठा पेच निर्माण झाला होता. 

सुनावणीदरम्यान राज्य सरकारवर सर्वोच्च न्यायालयानं ताशेरे ओढले. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं 28 मार्च 2024 रोजी बर्वे यांचे अनुसूचित जातीचे वैधता प्रमाणपत्र रद्द केलं. त्याविरुद्ध बर्वे यांची माचिका 24 सप्टेंबर 2024 रोजी मंजूर करण्यात आली. तसेच, रेकॉर्डवरील ठोस पुरावे लक्षात घेता बर्वे यांचा अनुसूचित जातीचा दावा सिद्ध होत असल्याचं जाहीर करण्यात आलं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : 'महाराष्ट्रात माझे दोनच मित्र, एक म्हणजे देवेंद्र फडणवीस अन् दुसरे संजय राऊत', नाना पटोलेंची मिश्कील टिप्पणी
'महाराष्ट्रात माझे दोनच मित्र, एक म्हणजे देवेंद्र फडणवीस अन् दुसरे संजय राऊत', नाना पटोलेंची मिश्कील टिप्पणी
Maharashtra Assembly Elections 2024 : उद्धव ठाकरे मुंबईत भाकरी फिरवणार, दोन आमदारांना डच्चू?, अजय चौधरी आणि फातर्पेकरांचा पत्ता कट?
उद्धव ठाकरे मुंबईत भाकरी फिरवणार, दोन आमदारांना डच्चू?, अजय चौधरी आणि फातर्पेकरांचा पत्ता कट?
ठरल्यातच जमा! शिंदेंची शिवसेना मुंबईत 15 जागा लढण्याची शक्यता; भाजप, अजितदादांच्या वाट्याला काय?
ठरल्यातच जमा! शिंदेंची शिवसेना मुंबईत 15 जागा लढण्याची शक्यता; भाजप, अजितदादांच्या वाट्याला काय?
Sanjay Raut : 'मी कोणावरही व्यक्तिगत टीका केलेली नाही', नाना पटोलेंच्या नाराजीनंतर संजय राऊतांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
'मी कोणावरही व्यक्तिगत टीका केलेली नाही', नाना पटोलेंच्या नाराजीनंतर संजय राऊतांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ramesh Chennithala : ठाकरेंची आणि मविआची तब्येत ठीक - रमेश चेन्नीथलाAjit Pawar Trimbakeshwar : अजित पवारांकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात पूजाAjit Pawar on Mahayuti :  सगळं व्यवस्थित चाललंय; काळजी नको - अजित पवारTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा:  12 PM :  19 ऑक्टोबर  2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : 'महाराष्ट्रात माझे दोनच मित्र, एक म्हणजे देवेंद्र फडणवीस अन् दुसरे संजय राऊत', नाना पटोलेंची मिश्कील टिप्पणी
'महाराष्ट्रात माझे दोनच मित्र, एक म्हणजे देवेंद्र फडणवीस अन् दुसरे संजय राऊत', नाना पटोलेंची मिश्कील टिप्पणी
Maharashtra Assembly Elections 2024 : उद्धव ठाकरे मुंबईत भाकरी फिरवणार, दोन आमदारांना डच्चू?, अजय चौधरी आणि फातर्पेकरांचा पत्ता कट?
उद्धव ठाकरे मुंबईत भाकरी फिरवणार, दोन आमदारांना डच्चू?, अजय चौधरी आणि फातर्पेकरांचा पत्ता कट?
ठरल्यातच जमा! शिंदेंची शिवसेना मुंबईत 15 जागा लढण्याची शक्यता; भाजप, अजितदादांच्या वाट्याला काय?
ठरल्यातच जमा! शिंदेंची शिवसेना मुंबईत 15 जागा लढण्याची शक्यता; भाजप, अजितदादांच्या वाट्याला काय?
Sanjay Raut : 'मी कोणावरही व्यक्तिगत टीका केलेली नाही', नाना पटोलेंच्या नाराजीनंतर संजय राऊतांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
'मी कोणावरही व्यक्तिगत टीका केलेली नाही', नाना पटोलेंच्या नाराजीनंतर संजय राऊतांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
रश्मी बर्वेंना 'सर्वोच्च' दिलासा; जात वैधता प्रमाणपत्र रद्द करणं बेकायदा; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
रश्मी बर्वेंना 'सर्वोच्च' दिलासा; जात वैधता प्रमाणपत्र रद्द करणं बेकायदा; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरमध्ये मविआचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोणत्या पक्षाला किती जागा? जाणून घ्या
मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरमध्ये मविआचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोणत्या पक्षाला किती जागा? जाणून घ्या
Maharashtra Assembly Elections 2024 : अनिल पाटलांचं टेन्शन वाढलं, अमळनेर विधानसभा मतदारसंघातून बड्या नेत्याने ठोकला शड्डू!
अनिल पाटलांचं टेन्शन वाढलं, अमळनेर विधानसभा मतदारसंघातून बड्या नेत्याने ठोकला शड्डू!
Mumbai Local Titwala : चाकरमान्यांनो लक्ष द्या... मध्य रेल्वेची वाहतूक 5 ते 10 मिनिटं उशिरानं, टिटवाळा अपघाताचा परिणाम मुंबई लोकलवर कायम
चाकरमान्यांनो लक्ष द्या... मध्य रेल्वेची वाहतूक 5 ते 10 मिनिटं उशिरानं, टिटवाळा अपघाताचा परिणाम मुंबई लोकलवर कायम
Embed widget