"निझामसारख्या मानसिकतेचे हे लोक", साखर कारखाने प्रकरणावरून माणिकराव जाधवांचा पवारांवर घणाघात
Maharashtra Incom Tax Raid : अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या काही कंपन्या आणि कारखान्यांची आयकर विभागाकडून सुरु असलेली छापेमारी चौथ्या दिवशीही सुरुच आहे. तर काही कंपन्यांची चौकशी तूर्तास थांबवण्यात आली आहे. अहमदनगरच्या कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्याची चौकशीही आजही सुरु आहे. तर तिकडे बारामतीतल्या डायनामिक्स डेअरीतही सलग चौथ्या दिवशी आयकर विभागाचे अधिकारी ठाण मांडून बसलेत. दरम्यान अजित पवारांच्या दोन बहिणी डॉ. रजनी इंदुलकर आणि नीता पाटील यांच्या घरी आयकर विभागानं सुरु केलेली चौकशी थांबवण्यात आली आहे. पार्थ पवारांचे निकटवर्तीय सचिन शिंगारेंचा कारखाना आयान मल्टीट्रेडसंदर्भात देखील आयकरनं चौकशी तूर्तास थांबवली आहे. तर अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांच्या मुंबईतल्या कार्यालयावर छापेमारी सुरु केली आहे. त्यांच्या श्री निर्मल कमर्शियल या कार्यालयात छापेमारी सुरु आहे.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
