एक्स्प्लोर
Devedra Fadnavis On Bmc Election : 'महायुती नको, स्वबळावर लढू द्या', कार्यकर्त्यांची फडणवीसांकडे मागणी
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील मतभेद समोर आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी वेगवेगळ्या बैठका घेऊन कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत. कोकण विभागातील भाजपा कार्यकर्त्यांनी 'महायुती मधून नको तर भाजपा मधूनच निवडणूकीच्या मैदानात उभं रु द्या,' अशी थेट मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांनी युतीचे महत्त्व पटवून दिले. युती करून पुढे गेल्यास विरोधकांना संधी मिळणार नाही आणि महायुतीला फायदा होईल, असे फडणवीस म्हणाले. त्यांनी हे ही स्पष्ट केले की, युतीचे अधिकार जिल्हा पातळीवर देण्यात आले असून, शक्य तिथे युतीचा प्रयत्न करण्याच्या सूचना आहेत. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी (BMC Elections) पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन, कोणतेही हेवेदावे न ठेवता लोकांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन केले.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
मुंबई
मुंबई
Advertisement
Advertisement

















