![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Ajit Pawar Meets Shahu Maharaj : उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराजांच्या भेटीला
कोल्हापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात सकाळीच अजित पवार यांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची न्यू पॅलेज इथे भेट घेतली. या भेटीदरम्यान संभाजीराजे यांचे बंधू आणि माजी आमदार मालोजीराजे छत्रपती देखील उपस्थित आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सगळ्यांचं लक्ष वेधणारी ही भेट आहे. मराठा आरक्षणाविरोधात संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेत आंदोलन पुकारलं आहे. त्यामुळे शाहू महाराज आणि अजित पवार यांच्यामध्ये काय चर्चा होते याकडे संपूर्ण मराठा समाजाचं लक्ष लागलं आहे.
खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची हाक दिली आहे. 6 जून रोजी रायगडवरील शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाल्यावर संभाजीराजेंनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडली. येत्या 16 जूनपासून कोल्हापुरातील राजर्षि शाहू महाराजांच्या समाधीपासून मराठा आरक्षण आंदोलनाला सुरुवात होईल असं संभाजीराजे म्हणाले. "राजसदरेवरुन बोलतोय, तुम्ही समाजाचा खेळ केला तर आम्ही गप्प बसणार नाही. मी संयमी आहे, आजपर्यंत सहन केलं पण आता गप्प बसणार नाही, काय होईल ते होईल असं सांगत संभाजीराजे छत्रपतींनी मराठा समाजाला आंदोलनाची हाक दिली आहे.
![Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 07 AM : 05 जुलै 2024: ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/05/ac914aaeba5972429cf152906af4c531172014721230390_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![ABP Majha Headlines 3PM एबीपी माझा हेडलाईन्स 3 PM 04 July 2024 Marathi News](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/30e8e957e5ee496c6e3ab75bf1a32ae11720085887425976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines 02 PM एबीपी माझा हेडलाईन्स 02 PM 04 July 2024 Marathi News](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/78f01b0fff58abbd29b149afd20932861720082990618976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines 1PM एबीपी माझा हेडलाईन्स 1 PM 04 July 2024 Marathi News](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/16358b77a4ae129dce59328b814a83691720082619963976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Police Constable Suspended : ललित पाटीलसोबत एक्सरेसाठी पोलिस गेलेच नसल्याचा ठपका, दोघेजण बडतर्फ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/8371a55f81745b9a1faf32116a4b4bc41720082083467976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)