Buldhana : बुलढाण्यात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारींकडे पदभार
Abp माझाच्या बातमीचा दणका.....
मध्य रात्रीच अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भागवत भुसारी यांनी घेतला जिल्हा शल्य चिकित्सक पदाचा पदभार.
मध्य रात्रीच निलंबित जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुभाष चव्हाण यांना करण्यात आल पदमुक्त.
बुलढाणा रूग्णालयातील अस्वच्छतेबाबत एबीपीच्या बातमीनंतर दणका
Abp माझाच्या बातमीची दखल घेत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या आदेशाने कारवाई.
बुलढाणा सामान्य रुग्णालय हे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जिल्ह्यातील मुख्यालय असलेले रुग्णालय... मात्र या रुग्णालयात अनेक बेवारस प्राणी फिरत असल्याने रुग्णांची सुरक्षा धोक्यात आली होती. बुलढाणा सामान्य रुग्णालय परिसरात व रुग्णालयातही डुक्कर , कुत्री , बकऱ्या आणि गाई फिरत असल्याचा वास्तव " एबीपी माझा " ने आपल्या बातमीत दाखवलं होतं. याची गंभीर दखल केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतली.... त्यांनी तात्काळ राज्याच्या आरोग्य सचिवांना यासंबंधी कारवाई करण्याचे आदेश दिले . व त्यानुसार आज बुलढाणा सामान्य रुग्णालयाचे प्रमुख व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांना निलंबित करण्यात आल आहे .त्यांच्या जागी उपशल्य चिकित्सक डॉ. भुसारी यांची तात्पुरती नेमणूक करण्यात आली आहे . ही सर्व माहिती राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी फोनवरून "एबीपी माझा "ला दिली आहे.