धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Ahmednagar Crime News : पांगरमल येथे शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाने केलेल्या मारहाणीत एका तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलीये. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
![धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू Ahmednagar Crime Three people including a woman were brutally beaten up by a mob on suspicion of stealing goats in Pangarmal one died Maharashtra Marathi News धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/05/18598bf216200a1544078df5a6dc465d1720147610483923_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Ahmednagar Crime News : अहमदनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पांगरमल (Pangarmal) येथे शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाने केलेल्या मारहाणीत एका तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलीये. गुरूवारी मध्यरात्री ही घटना घडली असून चांगदेव चव्हाण (Changdev Chavan) असे मयत तरूणाचे नाव आहे.
मारहाणीत एका महिलेसह तिघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रूग्णालयात (Hospital) उपचार सुरू आहेत. जखमी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पांगरमलचे सरपंच अमोल आव्हाड (Amol Awhad) तसेच सहा जणांसह इतर अनोळखी 20 ते 25 जणांविरूध्द खून , विनयभंग, अॅट्रोसिटी या कलमानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गावात शेळ्या चोरी जाताय म्हणत बेदम मारहाण
मयत चांगदेव चव्हाण हा मूळचा छत्रपती संभाजीनगर येथील असून मागील नऊ महिन्यांपासून पांगरमलमध्ये राहत होता. फिर्यादीनुसार काल मध्यरात्री एक जमाव चव्हाण यांच्या घरी आला आणि गावात शेळ्या चोरी जात आहेत, असं म्हणत जमावाने चव्हाण यांना मारहाण केली. या मारहाणीत चांगदेव चव्हाण याचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने करावाई करत सरपंचासह सहा जणांना अटक केली आहे. घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)