Ahmednagar Hospital Fire : आग विझली, राजकारण भडकलं; राष्ट्रवादी-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप ABP Majha
Ahmednagar Hospital Fire : अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये काल (शनिवारी) भीषण आग लागली. या आगीमध्ये होरपळून 11 जणांचा मृत्यू झाला. आग लागली त्यावेळी एकूण 17 रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत होते. त्यापैकी 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर अनेकजण होरपळले आहेत. दरम्यान, अहमदनगरमधील सरकारी रुग्णालयाला लागलेल्या आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयु वॉर्डात आग लागून झालेल्या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली आहे. तर याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत.
अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयू (ICU) विभागाला भीषण आग लागली. या आगीत होरपळून आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले (Ahmednagar collector Rajendra Bhosale) यांनी दिली. कोरोनावर मात करण्यासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांवर काळाने घाला घातला. काल (शनिवारी) सकाळी अचानक लागलेल्या आगीमध्ये (Ahmednagar Fire) अनेक रुग्ण होरपळले. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. ऐन दिवळी घडलेल्या या भयावह घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती आहे, असं जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी सांगितलं. मात्र इमारत आणि वायरिंगही नवीन असताना इतक्यात शॉर्टसर्किट कसं झालं, इमारतीचं फायर ऑडिट झालं होतं की नाही, अग्नीरोधक यंत्रणा आहे की नाही, असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
