एक्स्प्लोर
G20 New Delhi summit : दिल्लीत उद्यापासून दोन दिवस जी-20 परिषदेला सुरुवात
आता जी-२० संदर्भातील अपडेट... दिल्लीत उद्यापासून दोन दिवस जी-२० परिषदेला सुरुवात होतेय आणि या परिषदेसाठी जगभरातील दिग्गज नेत्यांचं आगमन सुरू झालंय. जी-२० परिषदेसाठी दिल्लीत प्रगती मैदानावर खास भारत मंडपम उभारण्यात आलाय. या परिषदेसाठी मॉरिशसचे पंतप्रधान कालच दाखल झालेत. तर आज सकाळपासून जागतिक नेत्यांच्या आगमनाला सुरुवात झालीय. अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांनी सकाळी वॉशिंग्टनवरून प्रयाण केलंय. अर्जेंटिनाचे अध्यक्ष अल्बर्टो फर्नांडिस... इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, कोमोरोसचे अध्यक्ष तसेच आफ्रिकन महासंघाचे अध्यक्ष अजली अस्सौमानी यांचं दिल्लीत आगमन झालंय.
आणखी पाहा























