(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mira Road मध्ये उंदिर मारण्याचं औषध घेत जीवन संपवण्याचा प्रयत्न : ABP Majha
पती-पत्नीनं उचललेल्या टोकाच्या पावलामुळे पोटच्या चिमुकल्या मुलीचा जीव गेल्याची घटना घडलेय... मिरा रोड येथील एका कुटुंबानं आर्थिक टंचाईला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत एका सात वर्षाच्या चिमुरडीचा जीव गेला असून, तिच्या आईवर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत. त्या स्त्रीचा पती मात्र या घटनेनंतर फरार झाला आहे. काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सीजन्स बॅन्क्वेट्स या हॉटेलमध्ये ही घटना घडली. रायन आणि पूनम हे दाम्पत्य सात वर्षांची मुलगी अमायकासोबत सीजन्स बॅन्क्वेट्स हॉटेलात उतरलं होतं. तिघांनी झुरळं आणि उंदीर मारण्याचं विषारी औषध प्राशन केलं होतं. रायन आणि पूनमवर त्याचा परिणाम झाला नाही. त्यामुळं रायननं पूनमचा गळा आवळून तिला मारण्याचा प्रयत्न केला. पण तिनं आरडाओरडा केल्यामुळं रायन तिथून पळून गेला. रुममधून ओरडण्याचा आवाज ऐकू आल्यानं हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला. त्यावेळी पूनम त्यांना जखमी अवस्थेत दिसली तर अमायकाचा मृत्यू झाला होता..