Uddhav Thackeray Raj Thackeray : ठाकरे बंधू एकमेकांना भेटले तो क्षण, आख्खा महाराष्ट्र स्तब्ध! आज संपूर्ण राज्याचं लक्ष हे मुंबईमधील वरळी डोम येथील ठाकरेंच्या विजयी मेळाव्याकडे लागलं आहे. तब्बल 18 वर्षांनंतर आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. भावांच्या विजयी मेळाव्यामध्ये राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे नेमकं कोणत्या मुद्द्यांवर बोलणार याची सर्वांचा उत्सुकता लागली आहे. हिंदीच्या मुद्यावर ठाकरी तोफा धडाडणार आहेत. मराठी अस्मितेसाठी दोन्ही भाऊ एकत्र येत असले तरीसुद्धा आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात आज घडणारी ही सर्वात मोठी घडामोड आहे. दरम्यान आता सोबत येत असलेले ठाकरे बंधू हे आगामी महापालिका निवडणुकीत उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येतील का? असा सवाल उपस्थित झालेला आहे. त्या अनुषंगाने एबीपी माझाने सोशल मिडीयावरती याबाबतचा पोल घेतला होता, त्यामध्ये राज्यातील मराठी लोकांना काय वाटतं ते जाणून घेऊया पोलच्या आकडेवारीतून