Vaishanvi Hagwane Postmartam : अंगावर 30 जखमा, वैष्णवी हगवणेच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काय काय?वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagwane) प्रकरणानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली. आजच्या काळातही हुंडाबळीसारख्या घटना घडत असल्यामुळे अनेकांचा संताप झाला, अनेकांनी यावर प्रतिक्रियाही दिल्या. सासरच्यांच्या शारीरिक आणि मानसिक जाचाला कंटाळून वैष्णवीनं 16 मे रोजी आपलं आयुष्य संपवलं. याप्रकरणी वैष्णवीचा जाच करुन तिला आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, नणंद करिश्मा हगवणे, सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. तसेच, याप्रकरणी आरोपींना सुनावण्यात आलेली कोठडी संपल्यामुळे बुधवारी सर्व आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी हगवणे कुटुंबीयांची बाजू मांडणाऱ्या वकिलांकडून अजब युक्तिवाद करण्यात आला. अमानुषपणे मारहाण करणाऱ्या, छळ करणाऱ्या हगवणे परिवाराच्या बचावासाठी कोर्टात त्यांच्या वकिलांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे देखील उडवले. वैष्णवी नको त्या व्यक्तीसोबत चॅट करायची तिचे चॅट पकडले असा संतापजनक दावा हगवणेच्या वकिलांनी केला. वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट ठेवण्यासोबतच तिची प्रवृत्तीच आत्महत्या करणारी होती, असंही हगवणेंचे वकील म्हणाले आहेत.