ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जुलै 2025 | रविवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जुलै 2025 | रविवार
1. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठुरायाची महापूजा, महाराष्ट्र अन् बळीराजाचे भलं व्हावं यासाठी विठ्ठलाच्या चरणी देवेंद्र फडणवीसांच साकडं, नाशिकचे उगले दाम्पत्य यंदाचे मानाचे वारकरी https://tinyurl.com/5y62u25v पांडुरंगा मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात जा, त्यांच्या मुखातून कर्जमाफीची तारीख जाहीर कर, बच्चू कडूंचं विठुरायाला साकडं https://tinyurl.com/jrb6zk4d
2. स्वतःची मुले बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकताना बॉम्बे नको मुंबई असं तुम्ही बोललात का? भाजपचे मंत्री आशिष शेलारांनी ठाकरे बंधूंना डिवचलं, त्यांची लेकरं तीन भाषा शिकणार आणि इतर मुलांनी शिकू नये अशी ठाकरेंची भूमिका, शेलारांची जोरदार टीका https://tinyurl.com/mr2rbwj4 काल भावकीचा खेळ पाहिला, दोन्ही ठाकरेंना मराठीशी काही घेणं देणं नाही, आशिष शेलारांची टीका, ठाकरे बंधूंच्या आंदोलनाची पहेलगाम हल्ल्याशी तुलना https://tinyurl.com/mppp4vjp पहेलगमामधील दहशतवादी तुमचे कोण आणि ते कसे पळून गेले? किशोरी पेडणेकरांचा शेलारांवर पलटवार, बाळा नांदगावकरही शेलारांवर भडकले https://tinyurl.com/3pemy6tt
3. 'स' सत्तेचा... भाजपच्या टिकेनंतर मनसेनं भाजपला सिंचन घोटाळा, आदर्श घोटाळा, महाराष्ट्र सदन घोटाळ्याची आठवण करुन दिली, मुख्यमंत्री फडणवीसांची जुनी वक्तव्ये समोर आणली https://tinyurl.com/mrxmban4 राज ठाकरे बडव्यांना शरण गेले, मंत्री प्रताप सरनाईक यांचं एकनाथ शिंदेंना भावनिक पत्र, मनातलं सगळं बोलले https://tinyurl.com/bdhunpk2
4. ठाकरेंच्या शिवसेनेतील उरलेले आमदार आणि खासदार आपल्या संपर्कात, विश्वास नसेल तर थोड्याच दिवसात चित्र दिसेल, भाजपचे मंत्री गिरीश महाजनांचा मोठा दावा https://tinyurl.com/38k9umj7
5. धाराशिवमध्ये वारकऱ्यानं आयुष्य संपवलं, पोलिसांच्या मानसिक छळामुळे टोकाचं पाऊल उचलल्याचा नातेवाईकांचा आरोप https://tinyurl.com/mrzmytch पंढरपूरला निघालेल्या वारकरी कुटुंबातील अल्पवयीन तरुणीवर अत्याचार करणारे अन् सोनं लुटणारे दोन नराधम पोलिसांना सापडले https://tinyurl.com/5xxjjcbn
6. कुठं जायचंय? मी सोडतो, नीटची तयारी करणाऱ्या मुलीचा नराधम रिक्षाचालकाकडून विनयभंग, अकोल्यात संतापजनक प्रकार https://tinyurl.com/7d2adjxe बीड अल्पवयीन विद्यार्थिनीच्या लैंगिक छळ प्रकरणाची व्याप्ती वाढली, शिक्षक विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांच्यावर दुसरा गुन्हा दाखल https://tinyurl.com/y84vvdna
7. निवृत्तीच्या आठ महिन्यांनंतरही माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांना सरकारी बंगला सुटता सुटेना, सुप्रीम कोर्टाचे केंद्र सरकारला पत्र, घर रिकामं करण्याचे आदेशही दिले https://tinyurl.com/2hctmmth
8. देशात गरिबांची संख्या वाढत आहे, काही श्रीमंत लोकांच्या हातामध्येच संपत्ती एकवटली, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी पुन्हा दाखवला वास्तवाचा आरसा https://tinyurl.com/23ar34ap
9. पुणे आणि घाटमाथ्याला दोन दिवस रेड अलर्ट, तब्बल 200 मिमी पावसाचा अंदाज, नाशिक, रत्नागिरीसह ठाणे, रायगडला ऑरेंज अलर्ट https://tinyurl.com/2vamnmxu
10. भारताला एजबेस्टन कसोटीत विजयाची संधी, पाचव्या दिवसाचा खेळ सुरु होताच इंग्लंडला धक्के, आकाश दीपकडून पोप-ब्रुकचा करेक्ट कार्यक्रम, भारत विजयापासून 5 विकेट दूर https://tinyurl.com/2ahwuk3z
एबीपी माझा विशेष
ठाकरे बंधूंच्या एकीचं तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्याकडून स्वागत, भाषिक अधिकारांसाठीच्या लढ्याने राज्याची सीमा ओलांडली, महाराष्ट्राचे आंदोलन नवी उर्जा देणारे, स्टॅलिन यांच्याकडून कौतुक https://tinyurl.com/4suuh8cy
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w





















