Thackeray Meleva Special Report: ठाकरेंचा मेळावा, उद्धव ठाकरे-राज ठाकरेंचं फ्लॅशबॅकचा आढावा
Thackeray Meleva Special Report: ठाकरेंचा मेळावा, उद्धव ठाकरे-राज ठाकरेंचं फ्लॅशबॅकचा आढावा
त्रिभाषा धोरणाबाबतचा जीआर सरकारने रद्द केल्यावर आता 5 जुलैला ठाकरेंची शिवसेना आणि मनसे विजयी मेळावा (MNS-Shivsena UBT Melava) साजरा करणार आहेत. मुंबईतील वरळी डोम येथे ठाकरेंची शिवसेना (Shivsena UBT) आणि मनसे (MNS) यांचा भव्य एकत्रित मेळावा होणार आहे. विजयी मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत. उद्या सकाळी 11.30 वाजता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे डोम ला पोहोचतील. दरम्यान, या विजयी रॅलीत कोणकोणते नेते भाषण करणार आहेत, याबाबतची माहिती मिळाली आहे.
हे नेते करणार भाषण
उद्या होणाऱ्या विजयी मेळाव्यात प्रकाश रेड्डी, जयंत पाटील (शेतकरी पक्ष), सुप्रिया सुळे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे अशी भाषणं होणार आहेत. जर काँग्रेसचे नेते आले तर त्यांना देखील भाषण करण्याची संधी दिली जाणार आहे. शेवटचं भाषण उद्धव ठाकरे यांचं असणार आहे. डोमच्या बाहेर हाजी अली, वरळीला जाणारे दोन्ही रस्ते पॅक होतील. तिथे स्क्रीन लावली जाणार आहे. बहुदा दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी बंद केले जाण्याची शक्यता आहे.



















