Devendra Fadanvis Speech : महाराष्ट्राची सगळी संकट दूर व्हावी..! CM फडणवीसांचं विठ्ठलापुढे साकडं
Devendra Fadanvis Speech : महाराष्ट्राची सगळी संकट दूर व्हावी..! CM फडणवीसांचं विठ्ठलापुढे साकडं
Ashadhi wari 2025: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठूरायाची महापूजा संपन्न; महाराष्ट्र अन् बळीराजासाठी विठ्ठलाच्या चरणी फडणवीसांचं साकडं Ashadhi wari 2025: विठुमाऊली व रखुमाईच्या चरणी नतमस्तक होत राज्यातील शेतकरी, कष्टकरी व सर्व जनतेच्या सुख-समृद्धी व महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रार्थना फडणवीस यांनी केली.
आषाढी एकादशीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (6 जुलै रोजी) पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पांडुरंगाची सपत्नीक शासकीय पूजा केली.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिविजा देखील उपस्थित होत्या. विठ्ठलाची महापूजा संपन्न झाल्यानंतर मुख्यमंत्री आपल्या कुटुंब आणि नाशिकमधील मानाचे वारकरी उगले दाम्पत्यासह रुक्मिणी मातेच्या दर्शनाला गेले.
रुक्मिणी मातेला दुग्धाभिषेक घालून मुख्यमंत्री फडणवीस आणि उगले दाम्पत्यांनी पूजा केली. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
आज आषाढी एकादशीचा आनंदोत्सव पंढरपूरमध्ये साजरा होत आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी वारकरी पंढरी नगरीत दाखल झाले आहेत. संपूर्ण पंढरपूर हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेले आहे.






















