एक्स्प्लोर

सावकारी जाचाला कंटाळून बीडमध्ये एकानं आयुष्य संपवलं; पोलिसांना सापडली 4 पानी सुसाईड नोट, पुन्हा राजकीय व्यक्तीचं नाव

बीड जिल्ह्यात वाढत चाललेल्या पतसंस्था, सावकारांचं जाळं आणि होणाऱ्या फसवणुकीच्या अनेक घटना गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आहेत

Beed: गेल्या अनेक महिन्यांपासून वेगवेगळ्या गुन्हेगारी घटनांमुळे चर्चेत आलेल्या बीड जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे . सावकारी जाचाला कंटाळून बीडमध्ये एकाने आत्महत्या केली आहे . राम असाराम फटाले (42)असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून आत्महत्येपूर्वी त्याने चार पानी सुसाईड नोट ठेवली होती . या सुसाईड नोटमध्ये भाजप भटके विमुक्त आघाडीचे डॉक्टर लक्ष्मण जाधव यांच्या नावासह त्यांच्या पत्नीचाही उल्लेख करण्यात आलाय .या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून याप्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय .पोलिसांनी तीन आरोपींना अटक केलीय .

बीड जिल्ह्यात वाढत चाललेल्या पतसंस्था, सावकारांचं जाळं आणि होणाऱ्या फसवणुकीच्या अनेक घटना गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आहेत . काही दिवसांपूर्वीच लेकीच्या लग्नासाठी पैसे मिळत नसल्याने वडिलांनी पथसंस्थेच्या गेटलाच गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार घडला होता. ही घटना ताजी असतानाच सावकारी जाचाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे .

नेमके प्रकरण काय?

सावकारी जाचामुळे बीडमध्ये एका तरुणाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. राम आसाराम फटाले (वय 42, रा. बीड) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याने आत्महत्येपूर्वी चार पानी चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यामध्ये सात जणांनी मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला आहे. यामध्ये भाजपा भटके विमुक्त आघाडीचे डॉ. लक्ष्मण जाधव आणि राम फटाले यांच्या पत्नीचाही उल्लेख आहे. घटनेनंतर पेठ बीड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि चौकशी सुरू केली. राम फटाले यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये, भाजप भटके विमुक्त आघाडीचे डॉक्टर लक्ष्मण जाधव यांच्या नावासह त्यांच्या पत्नीचाही उल्लेख करण्यात आलाय.

या प्रकरणी पेठ बीड पोलिस ठाण्यात डॉ. लक्ष्मण जाधव यांच्यासह सात जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन आरोपींना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. असे पोलीस निरीक्षक अशोक मोदीराज यांनी सांगितले.

काय लिहिलंय सुसाईड नोटमध्ये?

प्रिय आई व पप्पा सुजल व गौरी रेणुका,मी चांगला मुलगा पती वडील होऊ शकलो नाही तरी मला माफ करा..रेणुका तुला माझी जागा घेऊन माझे आई-वडील सुजल व गौरी यांची काळजी घ्यावी लागेल..शाम भाऊ लखन माझे मुले व बायको आई वडील यांचा सांभाळ करा व मला माफ करा..तुमचा सर्वाचा राम...माझे वडील यांच्याकडे माझी माती करण्यासाठी रुपये नाहीत.. माझी माती समाजाकडून वर्गणी करून करावी.. माझा दहावा, तेरावा, चौदावा करू नका.. कुणालाही मयतीला बोलावू नका.. वर्षश्राद्ध करू नका ही माझी इच्छा आहे... असे या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.

हेही वाचा

लेकीच्या लग्नासाठी उंबरठे झिजवले, पण सगळं निरर्थक; बीडमध्ये दीड वर्षात 10 मल्टिस्टेटनं गाशा गुंडाळला, ठेवीदारांनी करायचं काय?

 

 

महत्त्वाच्या बातम्या

5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
Embed widget