Akola Drought : अकोल्याच्या उगवा गावात दुष्काळाचा अत्यंत भेसूर चेहरा समोर
पाण्याशिवाय मानवी जीवन अपूर्ण समजलं जातं...त्यामुळेच पाण्याला जीवन असंही म्हटलं जातं...मात्र, याच पाण्याला अकोला जिल्ह्यातील उगवा गावात अगदी सोन्याची किंमत आल्याचं पहायला मिळतंय...गावात तीव्र पाणीटंचाई आहे...दुसरीकडे नळाला तब्बल महिनाभरानंतर पाणी येतंय...त्यामुळे गावकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ आलीये...आता हेच विकत घेतलेलं पाणी चोरी जावू नये म्हणून गावातील प्रत्येक घरात पाण्याच्या टाक्यांना कुलूपं लावण्यात आलीयेत...कडेकोट सुरक्षेत असलेल्या उगवा गावातील कुलूपबंद पाण्याच्या माध्यमातून दुष्काळाचा एक अत्यंत भेसूर चेहरा समोर आलाय...
दरम्यान उगवा ग्रामस्थांचं पाणीटंचाईचं वास्तव एबीपी माझानं समोर आणलंय...उगवा गावात जाऊन या संपूर्ण परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश अलोणे यांनी...
तालुकापातळीवर पाणीपुरवठ्यासाठी जबाबदार अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, असे निर्देश राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दिलेत...ग्रामीण भागात टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी 'जलदूत अॅप' चा वापर करावा, असंही विखेंनी सांगितलंय...























