एक्स्प्लोर

HMPV Virus Symptoms : HMPV VIRUS ची लक्षणं कोणती? डॉक्टरांनी दिली AटूZ सगळी माहिती

HMPV Virus Symptoms : HMPV VIRUS ची लक्षणं कोणती? डॉक्टरांनी दिली AटूZ सगळी माहिती

मुंबई: तब्बल दोन वर्षे संपूर्ण जगाला वेठीला धरणाऱ्या आणि लाखो लोकांचे जीव घेणाऱ्या कोरोना व्हायरसनंतर आता जगावर पुन्हा एकदा नव्या महामारीचा धोका निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये HMPV व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे कोरोनाप्रमाणे हा व्हायरस पुन्हा जगभरात पसरणार का, अशी भीती निर्माण झाली आहे. अशातच  भारतातील बंगळुरु शहरात HMPV व्हायरसचे दोन रुग्ण सापडल्याने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार का, अशा शंका-कुशंका ऐकायला मिळत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर साथीच्या आजारांचे तज्ज्ञ डॉ. रवी गोडसे यांनी 'एबीपी माझा'शी संवाद साधत HMPV व्हायरसबाबतच्या सर्व प्रश्नांची उत्तर दिली.

एचएमपीव्ही व्हायरसमुळे भारताला फारसा धोका नसल्याचे त्यांनी सर्वप्रथम स्पष्ट केले. त्यामुळे भारतीयांना काळजी करण्याची गरज नाही. सध्या चीनमधील लोक मास्क घालून फिरतानाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. मात्र, चीनमध्ये प्रदूषणाची समस्या असल्याने तेथील लोक नेहमीच मास्क घालून फिरतात. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. एचएमपीव्ही व्हायरस हा अत्यंत साधा आहे. तो अगदी कमी किंवा खूप जास्त वय असलेल्या व्यक्तींना होतो. विशेषत: लहान बालकांना एचएमपीव्ही व्हायरसची लागण होण्याची धोका असतो. मात्र, यामुळे गंभीर आजार होण्याची शक्यता खूपच दुर्मिळ आहे, असे डॉ. रवी गोडसे यांनी सांगितले.

चीनमध्ये इतकी गंभीर परिस्थिती का?

एचएमपीव्ही व्हायरस खूप धोकादायक असला तर मग चीनसारख्या प्रगत देशात लहान मुले मोठ्याप्रमाणावर रुग्णालयात का दाखल होत आहेत, असा प्रश्न विचारला जात आहे. याबाबत बोलताना डॉ. रवी गोडसे यांनी सांगितले की, चीनमध्ये कोरोनाच्या काळात झिरो कोव्हिड पॉलिसी होती. या काळात जी लहान मुले जन्माला आली, ती फारशी घराबाहेर पडली नाहीत. गेल्या दोन-तीन वर्षांपासून ही मुले घरातच बसून  होती. मुलं जन्माला आल्यानंतर सहा महिने आईचे दूध पितात. हे दूध बंद झाल्यानंतर पुढील सहा महिने मुलांसाठी महत्त्वाचे असतात. या काळात लहान मुलं आजारांचा सामना कसा करावा, हे शिकतात. त्यांच्यात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते.

मात्र, चीनमधील मुलं गेल्या दोन-तीन वर्षांपासून घराबाहेर न पडल्यामुळेच त्यांच्यात रोगप्रतिकारक शक्ती विकसित झालेली नाही. त्यामुळे या मुलांना HMPV व्हायरस झाल्यानंतर ती लगेच बरी न होता, त्यांना गंभीर आजार होत आहेत. 2027 पर्यंत HMPV व्हायरस जगातून निघून जाईल. चीनमध्ये लहान बालकांना HMPV व्हायरसची लागण होत आहे. त्यांच्याकडून पालकांना संक्रमण होण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे ही लहान मुले कुठेही प्रवास करण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे HMPV व्हायरस जगभरात पसरण्याची शक्यता नाही, असे डॉ. रवी गोडसे यांनी सांगितले.

आरोग्य व्हिडीओ

HMPV Virus Symptoms : HMPV VIRUS ची लक्षणं कोणती? डॉक्टरांनी दिली AटूZ सगळी माहिती
HMPV Virus Symptoms : HMPV VIRUS ची लक्षणं कोणती? डॉक्टरांनी दिली AटूZ सगळी माहिती

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धनंजय मुंडेंविरोधातल्या वक्तव्यावरून मोठा गदारोळ, मनोज जरांगे, दमानियांवर कारवाईसाठी वंजारींसह मुंडे समर्थक आक्रमक
धनंजय मुंडेंविरोधातल्या वक्तव्यावरून मोठा गदारोळ, मनोज जरांगे, दमानियांवर कारवाईसाठी वंजारींसह मुंडे समर्थक आक्रमक
प्राचीन हिंदू धर्मशास्त्र सर्वसामान्यांस समजावल्यास आपली संस्कृती समृद्ध होईल - चंद्रकांत पाटील
प्राचीन हिंदू धर्मशास्त्र सर्वसामान्यांस समजावल्यास आपली संस्कृती समृद्ध होईल - चंद्रकांत पाटील
Chhagan Bhujbal: शरद पवारांनी दिलेल्या 'त्या' कागदावर काय लिहलं होतं? छगन भुजबळ म्हणाले, 'पर्दे में रहने दो, पर्दा ना उठाओ!'
शरद पवारांनी दिलेल्या 'त्या' कागदावर काय लिहलं होतं? छगन भुजबळांच्या गूढ वक्तव्याने सस्पेन्स वाढला
Manoj Jarange Patil : इकडं सरपंच संतोष देशमुखांसाठी आक्रमक होताच मनोज जरांगे पाटलांचे कट्टर विरोधक एकवटले! तिकडं बीडमध्ये 24 तासात तीन गुन्हे दाखल
इकडं सरपंच संतोष देशमुखांसाठी आक्रमक होताच मनोज जरांगे पाटलांचे कट्टर विरोधक एकवटले! तिकडं बीडमध्ये 24 तासात तीन गुन्हे दाखल
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

HMPV Virus Symptoms : HMPV VIRUS ची लक्षणं कोणती? डॉक्टरांनी दिली AटूZ सगळी माहितीABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 06 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स-Navi Mumbai First Mango Price : वाशिमच्या APMC मध्ये केसर आंब्याची पहिली पेटी दाखल, भाव किती?All Party Leader Meet Governer Mumbai : सर्वपक्षीय नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट,काय मागणी केली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धनंजय मुंडेंविरोधातल्या वक्तव्यावरून मोठा गदारोळ, मनोज जरांगे, दमानियांवर कारवाईसाठी वंजारींसह मुंडे समर्थक आक्रमक
धनंजय मुंडेंविरोधातल्या वक्तव्यावरून मोठा गदारोळ, मनोज जरांगे, दमानियांवर कारवाईसाठी वंजारींसह मुंडे समर्थक आक्रमक
प्राचीन हिंदू धर्मशास्त्र सर्वसामान्यांस समजावल्यास आपली संस्कृती समृद्ध होईल - चंद्रकांत पाटील
प्राचीन हिंदू धर्मशास्त्र सर्वसामान्यांस समजावल्यास आपली संस्कृती समृद्ध होईल - चंद्रकांत पाटील
Chhagan Bhujbal: शरद पवारांनी दिलेल्या 'त्या' कागदावर काय लिहलं होतं? छगन भुजबळ म्हणाले, 'पर्दे में रहने दो, पर्दा ना उठाओ!'
शरद पवारांनी दिलेल्या 'त्या' कागदावर काय लिहलं होतं? छगन भुजबळांच्या गूढ वक्तव्याने सस्पेन्स वाढला
Manoj Jarange Patil : इकडं सरपंच संतोष देशमुखांसाठी आक्रमक होताच मनोज जरांगे पाटलांचे कट्टर विरोधक एकवटले! तिकडं बीडमध्ये 24 तासात तीन गुन्हे दाखल
इकडं सरपंच संतोष देशमुखांसाठी आक्रमक होताच मनोज जरांगे पाटलांचे कट्टर विरोधक एकवटले! तिकडं बीडमध्ये 24 तासात तीन गुन्हे दाखल
धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणं योग्य नाही, भुजबळांची भूमिका स्पष्ट; मनोज जरांगेंनाही लगावला टोला
धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणं योग्य नाही, भुजबळांची भूमिका स्पष्ट; मनोज जरांगेंनाही लगावला टोला
संतोष देशमुख प्रकरणी शरद पवारांचे मुख्यमंत्र्याना निवेदन; बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागरसह सुरेश धसांना सुरक्षा देण्याची मागणी
संतोष देशमुख प्रकरणी शरद पवारांचे मुख्यमंत्र्याना निवेदन; बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागरसह सुरेश धसांना सुरक्षा देण्याची मागणी
HMPV व्हायरसबाबत महत्त्वाची अपडेट, भारतातील लहान मुलांना कितपत धोका, व्हायरस महामारीचं रुप घेणार?
HMPV व्हायरसबाबत महत्त्वाची अपडेट, भारतातील लहान मुलांना कितपत धोका, व्हायरस महामारीचं रुप घेणार?
Sucess Story: आता आमचो आंबाच नाय ड्रॅगन पण! नोकरीचा नाद सोडून गावी परतला, 35 गुंठ्यात ड्रॅगनफ्रूटमधून तरुण कमावतोय..
आता आमचो आंबाच नाय ड्रॅगन पण! नोकरीचा नाद सोडून गावी परतला, 35 गुंठ्यात ड्रॅगनफ्रूटमधून तरुण कमावतोय..
Embed widget