एक्स्प्लोर

संतोष देशमुख प्रकरणी शरद पवारांचे मुख्यमंत्र्याना निवेदन; बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागरसह सुरेश धसांना सुरक्षा देण्याची मागणी

Sharad Pawar : सरपंच संतोष देशमुख प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे काही मागण्या केल्या आहेत.

Santosh Deshmukh Case : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची महिनाभरापूर्वी काही गुंडांनी निर्घृण हत्या केली. या क्रूर घटनेला भला मोठा काळ उलटून गेला असला तरी देशमुख यांचे मारेकरी अद्याप मोकाटच असल्याची जनभावना आहे. त्यामुळे, या संपूर्ण घटनेला फार मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे निदर्शनास येते. बीड- परळी भागात यापूर्वी देखील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे या गुंड प्रवृत्तीची पाळेमूळे खणून काढण्याची राज्यभरातील अनेक लोकप्रतिनिधींकडून मागणी होत आहे आणि त्यासाठी ते सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा करत आहेत. 

असे असताना याच गुंडांपासून या लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर लोकप्रतिनिधींच्या व इतर नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत त्यांना राज्य शासनामार्फत योग्य ते पोलीस संरक्षण पुरवावे, अशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मागणी  केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे  ही मागणी करण्यात आली आहे.

बजरंग सोनवणे,संदीप क्षीरसागर,जितेंद्र आव्हाडसह सुरेश धसांना सुरक्षा द्या- शरद पवार

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर महाराष्ट्र  संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा अर्थात मकोका अंतर्गत कारवाई करण्याच्या हालचाली सीआयडीने सुरु केल्याची माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांच्यासह इतरही आरोपींवर या आधी अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. यातील अनेक गुन्हे या आरोपींनी एकत्रितपणे कट रचुन केल्याचे दिसून येत असल्याने सीआयडीकडून या टोळीवर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. तसे घडल्यास वाल्मिक कराडच्या अडचणीत मोठी वाढ होऊ शकते. त्यामुळे संतोष देशमुख हत्याप्रकरणात पुढे काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

तर दुसरीकडे या प्रकरणावरून विरोधी बाकावरील नेत्यांसह सत्तेतील नेत्यांनीही धनंजय मुंडे आणि इतर संबंधितांवर आरोप करत केले आहे. दरम्यान या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार अभिमन्यू पवार, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार सुरेश धस, आमदार प्रकाश सोळंखे, यांना सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी शरद पवार (Sharad Pawar) यांनी निवेदनात केली आहे.    

हे ही वाचा 

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rajasthan Royals Caption: ना यशस्वी जैस्वाल, ना रविंद्र जडेजा, दुसऱ्यानेच मारली बाजी; संजू सॅमसनने साथ सोडताच राजस्थानची धुरा कोणाच्या गळ्यात?
ना यशस्वी जैस्वाल, ना रविंद्र जडेजा, दुसऱ्यानेच मारली बाजी; संजू सॅमसनने साथ सोडताच राजस्थानची धुरा कोणाच्या गळ्यात?
संदीप देशपांडे मनसे प्रवक्ते, जे बोलतात ती शिंदे गटाची की भाजपची भूमिका? वारंवार तुम्ही टीका का करता?? रुसवे फुगवे असेल तर दोन ठाकरे बंधू बोलतील; ठाकरेंच्या नेत्याचा खोचक टोला
संदीप देशपांडे मनसे प्रवक्ते, जे बोलतात ती शिंदे गटाची की भाजपची भूमिका? वारंवार तुम्ही टीका का करता?? रुसवे फुगवे असेल तर दोन ठाकरे बंधू बोलतील; ठाकरेंच्या नेत्याचा खोचक टोला
लव्ह यु दादा... भविष्यानं माझ्या ताटात काय वाढून ठेवले, ते सांगता येणार नाही; अमोल मिटकरींचं अजित दादांना व्हॅलेंटाईन पत्र
लव्ह यु दादा... भविष्यानं माझ्या ताटात काय वाढून ठेवले, ते सांगता येणार नाही; अमोल मिटकरींचं अजित दादांना व्हॅलेंटाईन पत्र
विलीनीकरणाबाबत चर्चा झाली नाही असा आमचा दावा नाही, दादा गेल्यानंतर परिस्थिती बदलली; आम्हाला भाजपला विश्वासात घ्यावं लागेल: हसन मुश्रीफ
विलीनीकरणाबाबत चर्चा झाली नाही असा आमचा दावा नाही, दादा गेल्यानंतर परिस्थिती बदलली; आम्हाला भाजपला विश्वासात घ्यावं लागेल: हसन मुश्रीफ

व्हिडीओ

Sanjay Raut PC : ज्यांनी शेण खाल्ले त्यांना जाब विचारला जाईल,चंद्रपूर महापौर प्रकरणावर राऊतांचा संताप
Shashikant Shinde NCP Merger :दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर अजितदादांकडेच नेतृत्व देणार होतो
Narhari Zirwal On Bribe Case : लाच प्रकरणाचा माझ्याशी संबंध सिद्ध झाला तर राजीनामा दईन
Monkey Attack School Student In Nandurbar : नंदूरबारच्या शाळेत माकडांचा उच्छाद,वनविभाग त्रासातून कधी सुटका करणार? Special Report
Ahilyanagar Saundala : जातमुक्तीच्या संकल्पातून घडलेलं आदर्शगाव 'सौंदाळा' Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajasthan Royals Caption: ना यशस्वी जैस्वाल, ना रविंद्र जडेजा, दुसऱ्यानेच मारली बाजी; संजू सॅमसनने साथ सोडताच राजस्थानची धुरा कोणाच्या गळ्यात?
ना यशस्वी जैस्वाल, ना रविंद्र जडेजा, दुसऱ्यानेच मारली बाजी; संजू सॅमसनने साथ सोडताच राजस्थानची धुरा कोणाच्या गळ्यात?
संदीप देशपांडे मनसे प्रवक्ते, जे बोलतात ती शिंदे गटाची की भाजपची भूमिका? वारंवार तुम्ही टीका का करता?? रुसवे फुगवे असेल तर दोन ठाकरे बंधू बोलतील; ठाकरेंच्या नेत्याचा खोचक टोला
संदीप देशपांडे मनसे प्रवक्ते, जे बोलतात ती शिंदे गटाची की भाजपची भूमिका? वारंवार तुम्ही टीका का करता?? रुसवे फुगवे असेल तर दोन ठाकरे बंधू बोलतील; ठाकरेंच्या नेत्याचा खोचक टोला
लव्ह यु दादा... भविष्यानं माझ्या ताटात काय वाढून ठेवले, ते सांगता येणार नाही; अमोल मिटकरींचं अजित दादांना व्हॅलेंटाईन पत्र
लव्ह यु दादा... भविष्यानं माझ्या ताटात काय वाढून ठेवले, ते सांगता येणार नाही; अमोल मिटकरींचं अजित दादांना व्हॅलेंटाईन पत्र
विलीनीकरणाबाबत चर्चा झाली नाही असा आमचा दावा नाही, दादा गेल्यानंतर परिस्थिती बदलली; आम्हाला भाजपला विश्वासात घ्यावं लागेल: हसन मुश्रीफ
विलीनीकरणाबाबत चर्चा झाली नाही असा आमचा दावा नाही, दादा गेल्यानंतर परिस्थिती बदलली; आम्हाला भाजपला विश्वासात घ्यावं लागेल: हसन मुश्रीफ
नरहरी झिरवळ आदिवासी असल्याने त्यांच्यावर ट्रॅप लावला; मंत्रालयातील लाचप्रकरणावर नाना पटोले स्पष्टच बोलले
नरहरी झिरवळ आदिवासी असल्याने त्यांच्यावर ट्रॅप लावला; मंत्रालयातील लाचप्रकरणावर नाना पटोले स्पष्टच बोलले
Pune Bus Fire : बसमध्ये 50 प्रवासी; अचानक शॉक सर्किट अन्...; पुण्यात PMPMLच्या चालत्या बसने घेतला पेट, क्षणार्धात जळून खाक
बसमध्ये 50 प्रवासी; अचानक शॉक सर्किट अन्...; पुण्यात PMPMLच्या चालत्या बसने घेतला पेट, क्षणार्धात जळून खाक
शंभूराज म्हणाले, भाजपची भूमिका नेहमीच सोयीस्कर; चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर, सांगितलं सांगलीतलं गणित
शंभूराज म्हणाले, भाजपची भूमिका नेहमीच सोयीस्कर; चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर, सांगितलं सांगलीतलं गणित
Bangladesh Election Result 2026: बांगलादेशात कट्टर धर्मांध राजकारण करणाऱ्या जमात ए इस्लामीचा तब्बल 10 पक्षांसोबत युती करूनही निवडणुकीत दारुण पराभव! बांगलादेश निवडणुकीतील 5 टर्निंग पाँईट
बांगलादेशात कट्टर धर्मांध राजकारण करणाऱ्या जमात ए इस्लामीचा तब्बल 10 पक्षांसोबत युती करूनही निवडणुकीत दारुण पराभव! बांगलादेश निवडणुकीतील 5 टर्निंग पाँईट
Embed widget