एक्स्प्लोर

धनंजय मुंडेंविरोधातल्या वक्तव्यावरून मोठा गदारोळ, मनोज जरांगे, दमानियांवर कारवाईसाठी वंजारींसह मुंडे समर्थक आक्रमक

मंत्री धनंजय मुंडे आणि वंजारी समाजाला टारगेट करणाऱ्या जरांगे आणि दमानिया यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी राज्यात वंजारी समाजासह मुंडे समर्थक आक्रमक झाले आहेत.

Maharashtra News:बीडच्या मस्साजोगमध्ये झालेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राज्यभर वातावरण तापलेले आहे. या सगळ्या प्रकरणात हत्याकारांना शिक्षा व्हावी यासाठी परभणीत झालेल्या मोर्चात मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी धनंजय मुंडेंवर जोरदार टीका केल्यानंतर परळीनंतर बीडमध्येही मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल करण्यात आला. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंवर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांविरोधात मराठवाड्यासह राज्यभर ठिकठिकाणी मुंडे समर्थक आक्रमक झाले आहेत. धनंजय मुंडेंवर (Dhananjay Munde) खालच्या भाषेत वक्तव्य करत कोणतही कारण नसताना वंजारी समाजाला धमकी देणाऱ्या मनोज जरांगे आणि अंजली दमानिया यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी आक्रमकपणे केली जाऊ लागली आहे. मंत्री धनंजय मुंडे आणि वंजारी समाजाला टारगेट करणाऱ्या जरांगे आणि दमानिया (Anjali Damania) यांच्या विरोधात कारवाईसाठी राज्यात परभणी, ठाणे, बुलढाणा, बीड, परळीसह अनेक भागात मुंडे समर्थकांसह वंजारी समाज आक्रमक झाला आहे. 

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील चार आरोपींना आज केज पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलं. प्रतीक घुले, महेश केदार, जयराम चाटे आणि विष्णू चाटे यांना अटक केल्यानंतर 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. यारोपिंना आणखी कोठडी वाढवण्याची शक्यता आहे. दरम्यान, मनोज जरांगेंसह अंजली दमानियांविरोधात कारवाईसाठी मुंडे समर्थकांनी दबाव वाढवलाय. पोलीस ठाण्याबाहेर समर्थक आक्रमकपणे गुन्हा नोंदवण्याची मागणी करतायत.

परभणीत जरांगेंवर गुन्ह्यासाठी ठाण्याबाहेर जमाव 

संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी परभणी शहरांमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे आणि वंजारी समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत या वक्तव्याने दोन समाजामध्ये तेढ निर्माण होत असून जातीजातीत भांडण लागणार असल्याने जरांगेंवर गुन्हा दाखल करावा ही मागणी होत आहे. या मागणीसाठी ओबीसी समाजाकडून परभणीतील गंगाखेड पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या करण्यात आला असून जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हलणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतलाय.

ठाण्यासह बुलढाण्यातही पोलीस ठाण्याबाहेर निदर्शन 

मंत्री धनंजय मुंडे यांना टार्गेट करणाऱ्या मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्या विरोधात कारवाईसाठी मुंडे समर्थक आणि वंजारी समाजाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून कारवाईसाठी ठाण्यासह बुलढाण्यातही पोलीस स्थानकाबाहेर निदर्शने करण्यात येत आहेत. बुलढाण्यातही मनोज जरांगे यांच्या वक्तव्यावर ओबीसी बांधवांनी धरणे आंदोलन सुरू केलं आहे. प्रचंड घोषणाबाजी करत त्यांनी पोलीस स्थानक परिसर दणाणून दिला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal: शरद पवारांनी दिलेल्या 'त्या' कागदावर काय लिहलं होतं? छगन भुजबळ म्हणाले, 'पर्दे में रहने दो, पर्दा ना उठाओ!'
शरद पवारांनी दिलेल्या 'त्या' कागदावर काय लिहलं होतं? छगन भुजबळांच्या गूढ वक्तव्याने सस्पेन्स वाढला
Manoj Jarange Patil : इकडं सरपंच संतोष देशमुखांसाठी आक्रमक होताच मनोज जरांगे पाटलांचे कट्टर विरोधक एकवटले! तिकडं बीडमध्ये 24 तासात तीन गुन्हे दाखल
इकडं सरपंच संतोष देशमुखांसाठी आक्रमक होताच मनोज जरांगे पाटलांचे कट्टर विरोधक एकवटले! तिकडं बीडमध्ये 24 तासात तीन गुन्हे दाखल
धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणं योग्य नाही, भुजबळांची भूमिका स्पष्ट; मनोज जरांगेंनाही लगावला टोला
धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणं योग्य नाही, भुजबळांची भूमिका स्पष्ट; मनोज जरांगेंनाही लगावला टोला
संतोष देशमुख प्रकरणी शरद पवारांचे मुख्यमंत्र्याना निवेदन; बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागरसह सुरेश धसांना सुरक्षा देण्याची मागणी
संतोष देशमुख प्रकरणी शरद पवारांचे मुख्यमंत्र्याना निवेदन; बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागरसह सुरेश धसांना सुरक्षा देण्याची मागणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navi Mumbai First Mango Price : वाशिमच्या APMC मध्ये केसर आंब्याची पहिली पेटी दाखल, भाव किती?All Party Leader Meet Governer Mumbai : सर्वपक्षीय नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट,काय मागणी केली?Dr Ravi Godse On HMPV virus : एचएममपीव्हीची व्हायरस नेमका काय आहे? डॉ. रवी गोडसेंनी सविस्तर सांगितलंABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 06 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal: शरद पवारांनी दिलेल्या 'त्या' कागदावर काय लिहलं होतं? छगन भुजबळ म्हणाले, 'पर्दे में रहने दो, पर्दा ना उठाओ!'
शरद पवारांनी दिलेल्या 'त्या' कागदावर काय लिहलं होतं? छगन भुजबळांच्या गूढ वक्तव्याने सस्पेन्स वाढला
Manoj Jarange Patil : इकडं सरपंच संतोष देशमुखांसाठी आक्रमक होताच मनोज जरांगे पाटलांचे कट्टर विरोधक एकवटले! तिकडं बीडमध्ये 24 तासात तीन गुन्हे दाखल
इकडं सरपंच संतोष देशमुखांसाठी आक्रमक होताच मनोज जरांगे पाटलांचे कट्टर विरोधक एकवटले! तिकडं बीडमध्ये 24 तासात तीन गुन्हे दाखल
धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणं योग्य नाही, भुजबळांची भूमिका स्पष्ट; मनोज जरांगेंनाही लगावला टोला
धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणं योग्य नाही, भुजबळांची भूमिका स्पष्ट; मनोज जरांगेंनाही लगावला टोला
संतोष देशमुख प्रकरणी शरद पवारांचे मुख्यमंत्र्याना निवेदन; बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागरसह सुरेश धसांना सुरक्षा देण्याची मागणी
संतोष देशमुख प्रकरणी शरद पवारांचे मुख्यमंत्र्याना निवेदन; बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागरसह सुरेश धसांना सुरक्षा देण्याची मागणी
HMPV व्हायरसबाबत महत्त्वाची अपडेट, भारतातील लहान मुलांना कितपत धोका, व्हायरस महामारीचं रुप घेणार?
HMPV व्हायरसबाबत महत्त्वाची अपडेट, भारतातील लहान मुलांना कितपत धोका, व्हायरस महामारीचं रुप घेणार?
Sucess Story: आता आमचो आंबाच नाय ड्रॅगन पण! नोकरीचा नाद सोडून गावी परतला, 35 गुंठ्यात ड्रॅगनफ्रूटमधून तरुण कमावतोय..
आता आमचो आंबाच नाय ड्रॅगन पण! नोकरीचा नाद सोडून गावी परतला, 35 गुंठ्यात ड्रॅगनफ्रूटमधून तरुण कमावतोय..
What is Human Metapneumovirus In India : भारतात एन्ट्री केलीच, एचएमपीव्ही व्हायरस किती खतरनाक? लक्षणे अन् उपाय काय? आपल्याला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे!
भारतात एन्ट्री केलीच, एचएमपीव्ही व्हायरस किती खतरनाक? लक्षणे अन् उपाय काय? आपल्याला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे!
Human Metapneumovirus : भारतात एकाच दिवसात HMVP व्हायरस बाधित दुसरा रुग्ण सापडला, महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर!
भारतात एकाच दिवसात HMVP व्हायरस बाधित दुसरा रुग्ण सापडला, महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर!
Embed widget