एक्स्प्लोर

HMPV व्हायरसबाबत महत्त्वाची अपडेट, भारतातील लहान मुलांना कितपत धोका, व्हायरस महामारीचं रुप घेणार?

HMPV virus india: एचएमपीव्ही व्हायरसमुळे जगभरात चिंता वाढली आहे. चीनमध्ये नेमकं काय घडतंय, भारतातील लहान मुलांना किती धोका? एचएमपीव्ही व्हायरसमुळे नेमकं काय होतंय?

मुंबई: तब्बल दोन वर्षे संपूर्ण जगाला वेठीला धरणाऱ्या आणि लाखो लोकांचे जीव घेणाऱ्या कोरोना व्हायरसनंतर आता जगावर पुन्हा एकदा नव्या महामारीचा धोका निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये HMPV व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे कोरोनाप्रमाणे हा व्हायरस पुन्हा जगभरात पसरणार का, अशी भीती निर्माण झाली आहे. अशातच  भारतातील बंगळुरु शहरात HMPV व्हायरसचे दोन रुग्ण सापडल्याने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार का, अशा शंका-कुशंका ऐकायला मिळत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर साथीच्या आजारांचे तज्ज्ञ डॉ. रवी गोडसे यांनी 'एबीपी माझा'शी संवाद साधत HMPV व्हायरसबाबतच्या सर्व प्रश्नांची उत्तर दिली.

एचएमपीव्ही व्हायरसमुळे भारताला फारसा धोका नसल्याचे त्यांनी सर्वप्रथम स्पष्ट केले. त्यामुळे भारतीयांना काळजी करण्याची गरज नाही. सध्या चीनमधील लोक मास्क घालून फिरतानाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. मात्र, चीनमध्ये प्रदूषणाची समस्या असल्याने तेथील लोक नेहमीच मास्क घालून फिरतात. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. एचएमपीव्ही व्हायरस हा अत्यंत साधा आहे. तो अगदी कमी किंवा खूप जास्त वय असलेल्या व्यक्तींना होतो. विशेषत: लहान बालकांना एचएमपीव्ही व्हायरसची लागण होण्याची धोका असतो. मात्र, यामुळे गंभीर आजार होण्याची शक्यता खूपच दुर्मिळ आहे, असे डॉ. रवी गोडसे यांनी सांगितले.

चीनमध्ये इतकी गंभीर परिस्थिती का?

एचएमपीव्ही व्हायरस खूप धोकादायक असला तर मग चीनसारख्या प्रगत देशात लहान मुले मोठ्याप्रमाणावर रुग्णालयात का दाखल होत आहेत, असा प्रश्न विचारला जात आहे. याबाबत बोलताना डॉ. रवी गोडसे यांनी सांगितले की, चीनमध्ये कोरोनाच्या काळात झिरो कोव्हिड पॉलिसी होती. या काळात जी लहान मुले जन्माला आली, ती फारशी घराबाहेर पडली नाहीत. गेल्या दोन-तीन वर्षांपासून ही मुले घरातच बसून  होती. मुलं जन्माला आल्यानंतर सहा महिने आईचे दूध पितात. हे दूध बंद झाल्यानंतर पुढील सहा महिने मुलांसाठी महत्त्वाचे असतात. या काळात लहान मुलं आजारांचा सामना कसा करावा, हे शिकतात. त्यांच्यात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते.

मात्र, चीनमधील मुलं गेल्या दोन-तीन वर्षांपासून घराबाहेर न पडल्यामुळेच त्यांच्यात रोगप्रतिकारक शक्ती विकसित झालेली नाही. त्यामुळे या मुलांना HMPV व्हायरस झाल्यानंतर ती लगेच बरी न होता, त्यांना गंभीर आजार होत आहेत. 2027 पर्यंत HMPV व्हायरस जगातून निघून जाईल. चीनमध्ये लहान बालकांना HMPV व्हायरसची लागण होत आहे. त्यांच्याकडून पालकांना संक्रमण होण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे ही लहान मुले कुठेही प्रवास करण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे HMPV व्हायरस जगभरात पसरण्याची शक्यता नाही, असे डॉ. रवी गोडसे यांनी सांगितले.

भारतातील लहान मुलांना HMPV व्हायरसचा धोका कमी का?

भारतात कोरोनाच्या काळात चीनइतका कठोर लॉकडाऊन नव्हता. त्यामुळे आपल्याकडील लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती शाबूत राहिली आहे. त्यामुळे हा व्हायरस भारतात फार पसरणार नाही. HMPV व्हायरसवर कोणताही उपाय किंवा लस नाही. पण 2027 पर्यंत आपोआप या व्हायरसचे उच्चाटन होईल, असे डॉ. रवी गोडसे यांनी सांगितले.

आणखी वाचा

जग पुन्हा महामारीच्या उंबरठ्यावर? चीनमधला नवा व्हायरस किती घातक? रुग्ण बरा होतो? आरोग्यतज्ज्ञांनी सांगितली A टू Z माहिती

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

HMPV व्हायरसबाबत महत्त्वाची अपडेट, भारतातील लहान मुलांना कितपत धोका, व्हायरस महामारीचं रुप घेणार?
HMPV व्हायरसबाबत महत्त्वाची अपडेट, भारतातील लहान मुलांना कितपत धोका, व्हायरस महामारीचं रुप घेणार?
What is Human Metapneumovirus In India : भारतात एन्ट्री केलीच, एचएमपीव्ही व्हायरस किती खतरनाक? लक्षणे अन् उपाय काय? आपल्याला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे!
भारतात एन्ट्री केलीच, एचएमपीव्ही व्हायरस किती खतरनाक? लक्षणे अन् उपाय काय? आपल्याला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे!
Human Metapneumovirus : भारतात एकाच दिवसात HMVP व्हायरस बाधित दुसरा रुग्ण सापडला, महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर!
भारतात एकाच दिवसात HMVP व्हायरस बाधित दुसरा रुग्ण सापडला, महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर!
Nandurbar News : मोठी बातमी : 23 वर्षीय दिपाली चित्तेला भोसकलं, तरुणीच्या मृत्यूने महाराष्ट्र हादरला
मोठी बातमी : 23 वर्षीय दिपाली चित्तेला भोसकलं, तरुणीच्या मृत्यूने महाराष्ट्र हादरला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 06 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्सWhat Is HMPV virus : चीनमध्ये HMPV व्हायरस, जगाला धडकी; नवा व्हायरस कोरोनापेक्षाही घातक?ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 06 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सBengaluru HMPV First Patient Found : भारतात HMPVचा पहिला बाधित आढळला, 8 महिन्याच्या बाळाला लागण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
HMPV व्हायरसबाबत महत्त्वाची अपडेट, भारतातील लहान मुलांना कितपत धोका, व्हायरस महामारीचं रुप घेणार?
HMPV व्हायरसबाबत महत्त्वाची अपडेट, भारतातील लहान मुलांना कितपत धोका, व्हायरस महामारीचं रुप घेणार?
What is Human Metapneumovirus In India : भारतात एन्ट्री केलीच, एचएमपीव्ही व्हायरस किती खतरनाक? लक्षणे अन् उपाय काय? आपल्याला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे!
भारतात एन्ट्री केलीच, एचएमपीव्ही व्हायरस किती खतरनाक? लक्षणे अन् उपाय काय? आपल्याला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे!
Human Metapneumovirus : भारतात एकाच दिवसात HMVP व्हायरस बाधित दुसरा रुग्ण सापडला, महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर!
भारतात एकाच दिवसात HMVP व्हायरस बाधित दुसरा रुग्ण सापडला, महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर!
Nandurbar News : मोठी बातमी : 23 वर्षीय दिपाली चित्तेला भोसकलं, तरुणीच्या मृत्यूने महाराष्ट्र हादरला
मोठी बातमी : 23 वर्षीय दिपाली चित्तेला भोसकलं, तरुणीच्या मृत्यूने महाराष्ट्र हादरला
Beed Crime: संतोष देशमुख प्रकरणात सीआयडीच्या मोठ्या हालचाली, वाल्मिक कराडला मकोका लागणार?
मोठी बातमी: वाल्मिक कराडला मोक्का लागणार? सीआयडीच्या हालचालींना वेग
Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल, इन्स्टाग्राम लाईव्हवर शिवीगाळ
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल, इन्स्टाग्राम लाईव्हवर शिवीगाळ
Walmik Karad : 'खाकी' आहे खंडणीखोर, हाफ मर्डर करणाऱ्यांच्या साक्षीला! दोन शासकीय बाॅडीगार्ड ठेवणाऱ्या वाल्मिक कराडवर 15 गुन्हे, सुदर्शन घुले त्याच्या पुढचा निघाला
'खाकी' आहे खंडणीखोर, हाफ मर्डर करणाऱ्यांच्या साक्षीला! दोन शासकीय बाॅडीगार्ड ठेवणाऱ्या वाल्मिक कराडवर 15 गुन्हे, सुदर्शन घुले त्याच्या पुढचा निघाला
चीनमधील HMPV व्हायरसच्या बातमीनं काळजात धडकी भरली, महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर; लक्षणं कशी ओळखावी?
चीनमधील HMPV व्हायरसच्या बातमीनं काळजात धडकी भरली, महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर; लक्षणं कशी ओळखावी?
Embed widget