Sucess Story: आता आमचो आंबाच नाय ड्रॅगन पण! नोकरीचा नाद सोडून गावी परतला, 35 गुंठ्यात ड्रॅगनफ्रूटमधून तरुण कमावतोय..
सुरुवातीला त्याने आपल्या शेतीत कलिंगड,अननस, झेंडूची फुले अशी पिके घेतली.मात्र कमी जागेत जास्त उत्पन्न देणाऱ्या ड्रॅगन फ्रूट ची आयडिया आणि चांगला हवामान आपल्या गावी असल्याने त्याला आली.
Success Story: कोकणात गावाकडे राहून काहीच करता येत नाही असं म्हणणाऱ्या तरुणांना गावाकडे शेतीतून लाखो रुपये कमावता येतात हे रायगडच्या तरुणानं दाखवून दिलंय. नोकरीसाठी मुंबईत वणवण करत फिरला पण चांगली नोकरी काही मिळेना. मग सरळ गावची वाट धरली. शेतात काहीतरी नवं करू या आशेनं. गावच्या जमिनीत कमावून एक वेगळा व्यवसाय उभारून तो यशस्वी करुन दाखवण्याचं उदाहरण एका तरुणाने इतरांसमोर ठेवलं आहे. रायगड जिल्हयातील (Raigad) पोलादपूर तालुक्यातील नाणेघोळ गावातील तरुण राजेंद्र कदम हा आपली मुंबई मधील नोकरी सोडून तीन वर्षांपुर्वीच गावाकडे परतला. फणस, नारळाचं साम्राज्य असणाऱ्या मातीत ड्रॅगन फ्रूट (Dragon Fruit Success) लावत आता अमर कदम लाखो रुपये या फळपिकातून कमावतायत. नोकरीच्या मागे वणवण फिरणाऱ्या या तरुणानं नोकरीचा नाद सोडून गावची वाट धरली आणि शेतीनं त्याला बळ दिलं. गावी येऊन आपल्या शेतात प्रचंड मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर प्रायोगिक शेती त्यानं केली. 'ड्रॅगन्स फ्रूटस्'चे लाखो रूपयांचे उत्पादन देणारी शेती सूरु केल्यानं आजूबाजूच्या शेतकऱ्यांना आमाचो हापूस, आमचो फणस यासोबतच कोकणाचो ड्रॅगन असंही म्हणता येईल हे या तरुणानं दाखवून दिलंय.
आयडिया सुचली, लगेच कामाला लागला, यशही मिळालं..
सुरुवातीला त्याने आपल्या शेतीत कलिंगड,अननस, झेंडूची फुले अशी पिके घेतली.मात्र कमी जागेत जास्त उत्पन्न देणाऱ्या ड्रॅगन फ्रूट ची आयडिया आणि चांगला हवामान आपल्या गावी असल्याने त्याला आली. शेतीची ओढ लागली आणि त्याने या शेतीकडे लक्ष केंद्रित केलं.आणि अखेर आज बघत बघता अमरची ड्रॅगन फ्रूट शेती यशस्वी झाली आहे.आज तो या शेतीतून लाखो रुपये महिन्याला कमावतो आहे. 35 गुंठा जागेत 6 ते 7 लाखाच उत्पन्न हा तरुण कमवतोय.
कशी केली शेती? प्रयोग यशस्वी झाला..
आपल्या शेतीत सुरूवातीला 350 ड्रॅगन फ्रूट साठी पोल उभे करणाऱ्या अमरने आतापर्यंत 1200 ड्रॅगन पोल आपल्या शेतात उभे केले आहेत. सुरूवातीला दोन वर्ष कठोर परिश्रम आणि केवळ मेहनत करताना अमरला अपेक्षित उत्पादन येण्याबाबत साशंकता निर्माण झाली. बाजारपेठेची मागणी आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रात मागणीच्या तुलनेत ड्रॅगन फ्रूटसचे उत्पादन व्हीएतनाम आणि चीनमध्ये याचे 20 टक्के उत्पादन सुरू होते. त्यामुळे भारतात हा प्रयोग यशस्वी होईल का असा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला .मात्र अमरने हे सर्व यशस्वी झाल्यानंतर पोलादपूर सारख्या ग्रामीण तालुक्यामध्ये अनेक तरूण जर या ड्रॅगन्स फ्रूट पिकासाठी सरसावले तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या मागणीनुसार मोठया प्रमाणात पुरवठा पोलादपूर तालुक्यातून केला जाऊ शकेल, असा आत्मविश्वास त्याने व्यक्त केला.