एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : जे. डे हत्या प्रकरण, छोटा राजनसह सर्व आरोपींना जन्मठेप, कोर्टात काय-काय झालं?
मुंबई : ज्येष्ठ पत्रकार ज्योर्तिमय डे यांच्या हत्येप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसह सर्व 9 दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. मुंबईतील विशेष मकोका कोर्टाने हा निर्णय दिला.
छोटा राजन, सतीश काल्या, अभिजीत शिंदे, अरुण डाके, सचिन गायकवाड, अनिल वाघमोडे, निलेश शेंडगे, मंगेश अगरवाल आणि दीपक सिसोडीया हे नऊ जण दोषी सिद्ध झाले आहेत. या सर्वांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
पुरावे आणि साक्षीनुसार छोटा राजन हा जे डेंच्या हत्येचा कट रचणारा मुख्य सूत्रधार असल्याचं समोर आलं होतं. छोटा राजन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात उपस्थित होता.
जे डे हत्या प्रकरणी 13 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा फरार आहे. उर्वरित 11 जणांपैकी जोसेफ पॉलसन आणि जिग्ना वोरा या दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा होण्याची शक्यता वर्तवली जात होती. दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण सिद्ध झाल्यास छोटा राजनला फाशीची शिक्षा सुनावली जाऊ शकते, पण ती शक्यता कमी होती. त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली
काय आहे प्रकरण?
छोटा राजन आणि दाऊद इब्राहिम यांच्यातील गँगवारच्या वादात अनेकांचे बळी गेले आहेत. याच वादाचा बळी जे डेही ठरले होते. 11 जून 2011 रोजी मुंबईतील पवईमध्ये हिरानंदानी परिसरात जे डे यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.
जे डे यांची हत्या छोटा राजन गँगमार्फत करण्यात आल्याचं समोर आलं होतं. या हत्येमध्ये पत्रकार जिग्ना वोराचं नावसुद्धा जोडलं गेलं होतं. जे डे यांच्या हत्येमुळे संपूर्ण मीडिया विश्वात खळबळ माजली होती.
पुरावे आणि साक्षीनुसार, छोटा राजन हा जे डेंच्या हत्येचा कट रचणारा मुख्य सूत्रधार असल्याचं समोर आलं. तर, राजनच्या संभाषणात जिग्ना वोराचा उल्लेख होता. जिग्नाच्या सीडीआर पुराव्यानुसार ती छोटा राजनच्या सातत्याने संपर्कात असल्याचं आढळून आलं.

महाराष्ट्र
Amit Shah Bag Check : अमित शाहांनाही रोखलं,निवडणूक पथकाने तपासली एक-एक बॅग!
CM Eknath Shinde Nanded Speech : एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो..नांदेडच्या सभेत शिंदेंचं तुफान भाषण
Raj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मला
Nashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला, नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडा
Shreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
पुणे
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement