(Source: ECI/ABP News/ABP Majha)
महाराष्ट्रात पूरग्रस्त भागात उद्या होणाऱ्या CA फाउंडेशन परीक्षेचं काय? पूरस्थितीत परीक्षा कशी देणार?
मुंबई : उद्यापासून देशातील सर्व राज्यात सीए फाउंडेशन कोर्स जून -जुलै 2021ही परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र, राज्यात रत्नागिरी, रायगड भागातील पूरपरिस्थिती पाहता या भागातील विद्यार्थ्यांसाठी तरी या परीक्षा बाबत काही निर्णय घेतला जाणार का ? पुढे ढकलली जाणार का? किंवा विद्यार्थ्यांना काही सवलत मिळणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. मात्र, यामुळे काहीसा संभ्रम जरी निर्माण झाला असला तरी याबाबत द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाउंटटस ऑफ इंडियाने याबाबत कुठलेही अधिकृत सूचना दिलेली नाही
द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाउंटटस ऑफ इंडियाने 5 जुलै रोजी जाहीर केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे 24,26,28 आणि 30 जुलै रोजी सीए फाउंडेशन कोर्स अभ्यासक्रमाची परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी विद्यार्थ्यांना कोव्हीड परिस्थितीचा विचार करता असाधारण परिस्थितीत कोव्हीड पॉझिटिव्ह असलेल्या विद्यार्थ्याला opt out option देण्यात आला आहे. या पर्यायाचा विद्यार्थ्याने स्वीकार केल्यास त्याला जुलै ऐवजी ही परीक्षा नोव्हेंबरमध्ये पुन्हा देता येणार आहे. सी ए फाउंडेशनसाठी हा पर्याय विद्यार्थ्यांना 28 जून ते 30 जुलै पर्यंत उपलब्ध आहे. त्यामुळे साधारण परिस्थितीमध्ये जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकणार नाहीत त्यांना या पर्यायाद्वारे जुलै ऐवजी नोव्हेंबर मध्ये हे पेपर द्यावे लागतील
राज्यातील पूरस्थितीचे वतावरण पाहता अनेक विद्यापीठांनीही आपल्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत, मात्र आयसीएआयकडून अद्याप कोणत्याही प्रकारच्या सूचना देण्यात आल्या नाहीत यामुळे ही परीक्षा देणारे विद्यार्थी चिंतेत आहेत. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना केंद्रावर पोहचयला अडचणी येणार आहेत,त्यांच्या परीक्षेचं काय? राज्यात कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्यात परिक्षेचे केंद्र आहेत. त्या ठिकाणी परीक्षा घेतली जात असताना अडचणी येत असतील तर नेमकं काय केलं जाणार? परीक्षा रद्द झाल्या नाहीत तर विद्यार्थ्यांना परीक्षांना मुकावे लागणार का? असे प्रश्न विद्यार्थी पालक उपस्थित करत आहेत.