Zero Hour : वर्षा गायकवाडांना खासदार करणार, उद्धव ठाकरे यांचा निर्धार ABP Majha
zero Hour : वर्षा गायकवाडांना खासदार करणार, उद्धव ठाकरे यांचा निर्धार ABP Majha
ठाकरेंचा निर्धार पूर्ण होईल की नाही.. हे तर चार जूनलाच कळेल.. पण, जसं मी आधी म्हणाले की याच मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून महायुतीकडून अजूनही उमेदावार फायनल झालेला नाहीय.. इथं भाजपकडून पूनम महाजन खासदार आहेत.. मात्र, यावेळी इथून कोणत्याही उमेदवाराचं नाव जाहीर झालेलं नाहीय. त्यातच आजच बातमी धडकली की ज्येष्ठ कायदेज्ज्ञ उज्ज्वल निकम यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. वर्षा गायकवाडांच्याविरोधात भाजपकडून अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे..
जरा मुंबई उत्तर मध्य मतदारसंघ समजून घेऊ. सहा आमदार आहेत.. त्यातले दोन भाजप, दोन शिवसेना, एक शिवसेना UBT आणि एक काँग्रेस... म्हणायला वर्ष गाईकवाडांच्या बाजूने २ आणि विरोधात ४ आमदार असं मानायला हरकत नाही. पण काँग्रेसच्या आमदाराचं नाव आहे नाव झिशान बाबा सिद्दिकी.. नुकतेच बाबा सिद्दिकी हे अजित दादांच्या राष्ट्रवादीसोबत गेलेय आणि झीशानने हि आपली नाराजी उघड केली आहे. त्यामुळे वर्षा गायकवाडांसोबत या मतदारसंघात फक्त उद्धव ठाकरेंचा एक आमदार असणार आहे.
त्यातच उत्तर मध्य मुंबईतून तिकीटासाठी इच्छुक नसीम खान उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेत.. त्यांनी तडकाफडकी काँग्रेस स्टार प्रचारक पदाचा राजीनामा दिला...