एक्स्प्लोर

Sharad Pawar : काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केलेल्या नेत्यांवर राष्ट्रवादी शरद पवार गटाने निलंबनाची कारवाई केली आहे.

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Election 2024) रणधुमाळी सुरु झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) बंडखोरी केलेल्या नेत्यांवर कारवाई करण्यात येत आहे. याआधी भाजप (Congress) आणि काँग्रेसने (Congress) बंडखोरांविरोधात कारवाईची बडगा उगारला होता. आता या पाठोपाठ राष्ट्रवादी शरद पवार गटाने (NCP Sharad Pawar Group) दोन बंडखोरांचे निलंबन केले आहे. 

राहुल जगताप निलंबित

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात (Shrigonda Assembly Constituency) महायुतीकडून विक्रम पाचपुते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसून आले. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटातून राहुल जगताप यांना उमेदवारी मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र,  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटामधून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केलेल्या अनुराधा नागवडे यांना महाविकास आघाडीची उमेदवारी देण्यात आली. यामुळे राहुल जगताप नाराज झाले होते. त्यानंतर जाहीर सभा व रॅली काढून माजी आमदार राहुल जगताप यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आता शरद पवार गटाकडून राहुल जगताप यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. 

राजू तिमांडे यांच्यावरही कारवाई

तर हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात महायुतीतून विद्यमान आमदार समीर कुणावार यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून प्रदेश सरचिटणीस अतुल वांदीले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे नाराज झालेल्या माजी आमदार राजू तिमांडे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे हिंगणघाटमध्ये महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढल्याचे चित्र आहे. आता राजू तिमांडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाने कारवाईची बडगा उगारला आहे. राजू तिमांडे यांना निलंबित करण्यात आले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

मोठी बातमी : पारनेरमध्ये शेवटच्या क्षणी गेम फिरला, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजितदादा गटाच्या उमेदवाराला पाठिंबा

Ahmednagar District Vidhan Sabha Election : साखर कारखानदारांच्या जिल्ह्यात कोण वरचढ ठरणार? नगरमधील 12 मतदारसंघांचे चित्र स्पष्ट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

फडणवीस साहेब, शेतकऱ्यांच्या मालाला दर द्या, नाहीतर लग्नासाठी मुलगी शोधून द्या; भंडाऱ्यातील तरुणाचं अनोखं आंदोलन
फडणवीस साहेब, शेतकऱ्यांच्या मालाला दर द्या, नाहीतर लग्नासाठी मुलगी शोधून द्या; भंडाऱ्यातील तरुणाचं अनोखं आंदोलन
नागपुरात हत्याकांडाचा थरार! काली माता मंदिरासमोर सख्या मामानेच भाच्याला संपवले, भावाला वाचवायला गेलेला दुसराही गंभीर जखमी
नागपुरात हत्याकांडाचा थरार! काली माता मंदिरासमोर सख्या मामानेच भाच्याला संपवले, भावाला वाचवायला गेलेला दुसराही गंभीर जखमी
Walmik Karad: वाल्मीक कराडवरील आर्थिक आणि मानसिक दबाव वाढवला, सरेंडर करण्याशिवाय पर्यायच उरला नाही
वाल्मीक कराडसमोर सरेंडर करण्याशिवाय पर्यायच उरला नाही, गेल्या 24 तासांत काय घडलं?
Dhananjay Munde: धनंजय मुंडेंबाबत पक्ष जी भूमिका घेईल ती आम्हाला मान्य; राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याच्या सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
धनंजय मुंडेंबाबत पक्ष जी भूमिका घेईल ती आम्हाला मान्य; राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याच्या सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

LNG MSRTC : ST महामंडळाला LNG पुरवणाऱ्या कंपनीची मुख्यमंत्र्यांकडे तक्रारRatnagiri Beach Zipline : आरे वारे बीचवर झीप लाईनचा विहंगम थरार, समुद्राची नयनरम्य दृश्यTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM : 30 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  9 AM : 30 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फडणवीस साहेब, शेतकऱ्यांच्या मालाला दर द्या, नाहीतर लग्नासाठी मुलगी शोधून द्या; भंडाऱ्यातील तरुणाचं अनोखं आंदोलन
फडणवीस साहेब, शेतकऱ्यांच्या मालाला दर द्या, नाहीतर लग्नासाठी मुलगी शोधून द्या; भंडाऱ्यातील तरुणाचं अनोखं आंदोलन
नागपुरात हत्याकांडाचा थरार! काली माता मंदिरासमोर सख्या मामानेच भाच्याला संपवले, भावाला वाचवायला गेलेला दुसराही गंभीर जखमी
नागपुरात हत्याकांडाचा थरार! काली माता मंदिरासमोर सख्या मामानेच भाच्याला संपवले, भावाला वाचवायला गेलेला दुसराही गंभीर जखमी
Walmik Karad: वाल्मीक कराडवरील आर्थिक आणि मानसिक दबाव वाढवला, सरेंडर करण्याशिवाय पर्यायच उरला नाही
वाल्मीक कराडसमोर सरेंडर करण्याशिवाय पर्यायच उरला नाही, गेल्या 24 तासांत काय घडलं?
Dhananjay Munde: धनंजय मुंडेंबाबत पक्ष जी भूमिका घेईल ती आम्हाला मान्य; राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याच्या सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
धनंजय मुंडेंबाबत पक्ष जी भूमिका घेईल ती आम्हाला मान्य; राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याच्या सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
Walmik Karad: फरार वाल्मिक कराड पोलिसांच्या अंगरक्षरकांना घेऊन महाकालाच्या दर्शनाला? 'ते' फोटो समोर
वाल्मीक कराडचं शेवटचं मोबाईल लोकेशन सापडलं, संकटकाळी देवाच्या दारी, मुक्काम नेमका कुठे?
'केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान', राहुल गांधींवर टीका करताना नितेश राणेंचं वादग्रस्त विधान!
'केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान', राहुल गांधींवर टीका करताना नितेश राणेंचं वादग्रस्त विधान!
Team India WTC Final Scenario : मेलबर्न कसोटी हरली तर टीम इंडिया कशी जाणार WTC फायनलमध्ये? जाणून घ्या समीकरण
मेलबर्न कसोटी हरली तर टीम इंडिया कशी जाणार WTC फायनलमध्ये? जाणून घ्या समीकरण
दिवसाढवळ्या ख्रिश्चन दफनभूमीत खून, चौकीदाराला भोसकलं, नागपुरमध्ये सलग दुसऱ्या हत्याकांडाने महाराष्ट्र हादरला
दिवसाढवळ्या ख्रिश्चन दफनभूमीत खून, चौकीदाराला भोसकलं, नागपुरमध्ये सलग दुसऱ्या हत्याकांडाने महाराष्ट्र हादरला
Embed widget