Zero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये
Zero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये
बटेंगे तो कटेंगेवरून भाजपमध्येच वेगळा सूर...पंकजा मुंडेंपाठोपाठ राधाकृष्ण विखे पाटलांचाही आक्षेप...महाराष्ट्राला असल्या प्रचाराची गरज नसल्याचं विखेंचं माझा कट्ट्यावर मत...
राहुल गांधींनीच मला आणि सुजयला पक्षाबाहेर जाण्याची वेळ आणली, विखे पाटलांचा माझा कट्ट्यावर गंभीर आरोप, सुजयला राष्ट्रवादीच्या तिकीटावर लोकसभा लढायला सांगितलं असा गौप्यस्फोट..
मुख्यमंत्रिपदासाठी काही नवी नावं शक्य, भाजप नेते विनोद तावडेंचे संकेत, निकालानंतर राजकीय-सामाजिक परिस्थिती पाहून निर्णय अपेक्षित
शिंदे, फडणवीस, अजितदादांची नावं गुजरातीत ट्विट करत संजय राऊतांनी महायुतीला डिवचलं...तर शरद पवार, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंची नावं उर्दूत लिहित चित्रा वाघांचं प्रत्युत्तर..
शिवाजी पार्कवर १७ नोव्हेंबरच्या सभेसाठी परवानगी कुणाला मिळणार सस्पेन्स कायम...मनसेलाही अजून हिरवा कंदील नाही, ठाकरेंच्या शिवसेनेची रस्सीखेच...
नाशिकमध्ये महायुती आणि मविआमध्ये राडा...
नाशिक पूर्वचे मविआचे उमेदवार गणेश गीतेंच्या प्रचाराच्या वाहनावर भाजप कार्यकर्त्यांकडून हल्ला...सुप्रिया सुळेंची पोलीस आयुक्तालयात धडक...