एक्स्प्लोर

Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

Priyanka Gandhi : काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. गडचिरोलीतील प्रचारसभेनंतर प्रियांका गांधी यांनी नागपूरमध्ये रोड शो आयोजित करण्यात आला आहे.

Priyanka Gandhi Nagpur Road Show नागपूर : काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. प्रियांका गांधी यांनी गडचिरोतील सभेला संबोधित केल्यानंतर नागपूरमध्ये रोड शोचं आयोजन करण्यात आलं आहे.  नागपूर मध्य या विधानसभा मतदारसंघात प्रियांका गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांच्या प्रचारासाठी रोड शोचं आयोजन करण्यात  आलं आहे.  या रोड शो दरम्यान काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमने आल्याचं पाहायला मिळाले. 

बडकस चौकात काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले आहेत. प्रियांका गांधी यांचा रोड शो बडकस चौकात संपला. काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने आल्यानं घोषणाबाजी झाली. गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून आपापल्या पक्षाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी झाल्याचं पाहायला मिळालं. 

प्रियांका गांधी यांचा रोड शो संघाच्या मुख्यालयाजवळ येणार हे समजताच भाजपचे कार्यकर्ते सकाळपासून जमले होते. काँग्रेस कार्यकर्ते देखील तयारीत होते. रोड शो संपल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते देखील बडकस चौकात आहेत. पोलिसांनी कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी  सौम्य बळाचा वापर केल्याची माहिती आहे. 

रोड शो संपल्यानंतर काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांनी चौकाच्या मधोमध एका ट्रक वर उभे राहून भाषण देण्यास सुरुवात केली. बंटी शेळके यांनी त्यांच्या हातात तिरंगा घेत कार्यकर्त्यांना तुम्हाला तीन रंगाचा झेंडा पाहिजे की दोन रंगांचा झेंडा पाहिजे असा सवाल केला.  काँग्रेस कार्यकर्ते आणि बंटी शेळकेंना इमारतीवरुन आणि रस्त्यावर जमलेल्या भाजप समर्थकांकडून भाजपचे झेंडे दाखवण्यात आले. 

पोलिसांनी वेळीच वाद रोखला

काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने आल्यानंतर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं हे प्रकरण वाढलं नाही. पोलीस अधिकाऱ्यांकडून रोड शो वेगानं पुढं नेण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. पोलिसांची अपेक्षा अशी होती की संध्याकाळ होण्यापूर्वी रोड शो गतीनं निघून जावा. पोलिसांनी धिम्या गतीनं चालणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना वेगानं पुढं जाण्यास सांगितलं असता काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले. एसीपी अनिता मोरे यांच्यासोबत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हुज्जत घालत वाद घातला.  रोडशो अपेक्षित गतीने पुढे जात नाही म्हणून अनिता मोरे आणि इतर पोलीस अधिकारी रस्त्यात थांबून घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पुढे ढकलत होते.  तेव्हा काँग्रेसचे अनेक पुरुष कार्यकर्ते चिडले आणि अनिता मोरे इतर पोलीस अधिकाऱ्यांना जाब  विचारु लागले. यामध्ये काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले होते. काही कार्यकर्ते पोलिसांच्या अंगावर धावून गेल्याचं पाहायला मिळालं. 

इतर बातम्या : 

लग्न आमचं, मुलं आम्हाला झाली आणि लाडू भलतेच वाटताय; महामार्गाच्या श्रेयावरुन नितीन गडकरी यांचा रोहित पवारांना टोला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parbhani Crime :तिसरी मुलगीच, हैवान पतीने पेटवलं, जळत्या अंगाने पत्नी धावत राहिली, दोन दुकानंही पेटली!
तिसरी मुलगीच, हैवान पतीने पेटवलं, जळत्या अंगाने पत्नी धावत राहिली, दोन दुकानंही पेटली!
Crime : प्रॉपर्टीच्या वादातून राग अनावर, तीन जणांनी गळा दाबून एकास संपवलं, कुर्ल्यात खळबळ
प्रॉपर्टीच्या वादातून राग अनावर, तीन जणांनी गळा दाबून एकास संपवलं, कुर्ल्यात खळबळ
Anjali Damania : जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत बीड सोडणार नाही, मुंडेना मंत्रीपद सोडायला भाग पाडू; अंजली दमानियांचा बीडमध्ये एल्गार!
जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत बीड सोडणार नाही, धनंजय मुंडेना मंत्रीपद सोडायला भाग पाडू; अंजली दमानियांचा बीडमध्ये एल्गार!
Anjali Damania : अंजली दमानिया मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांच्या भेटीला, 'ती' कॉल रेकॉर्डिंग ऐकवत म्हणाल्या, जोपर्यंत न्याय मिळत नाही...
अंजली दमानिया मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांच्या भेटीला, 'ती' कॉल रेकॉर्डिंग ऐकवत म्हणाल्या, जोपर्यंत न्याय मिळत नाही...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 AM : 28 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 90 : 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 28 डिसेंबर 2024: ABP MajhaManmohan Singh Funeral :माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी काँग्रेस मुख्यालयातDhananjay Deshmukh on Santosh Deshmukh Case : तपासावर समाधानी नाही, मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parbhani Crime :तिसरी मुलगीच, हैवान पतीने पेटवलं, जळत्या अंगाने पत्नी धावत राहिली, दोन दुकानंही पेटली!
तिसरी मुलगीच, हैवान पतीने पेटवलं, जळत्या अंगाने पत्नी धावत राहिली, दोन दुकानंही पेटली!
Crime : प्रॉपर्टीच्या वादातून राग अनावर, तीन जणांनी गळा दाबून एकास संपवलं, कुर्ल्यात खळबळ
प्रॉपर्टीच्या वादातून राग अनावर, तीन जणांनी गळा दाबून एकास संपवलं, कुर्ल्यात खळबळ
Anjali Damania : जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत बीड सोडणार नाही, मुंडेना मंत्रीपद सोडायला भाग पाडू; अंजली दमानियांचा बीडमध्ये एल्गार!
जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत बीड सोडणार नाही, धनंजय मुंडेना मंत्रीपद सोडायला भाग पाडू; अंजली दमानियांचा बीडमध्ये एल्गार!
Anjali Damania : अंजली दमानिया मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांच्या भेटीला, 'ती' कॉल रेकॉर्डिंग ऐकवत म्हणाल्या, जोपर्यंत न्याय मिळत नाही...
अंजली दमानिया मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांच्या भेटीला, 'ती' कॉल रेकॉर्डिंग ऐकवत म्हणाल्या, जोपर्यंत न्याय मिळत नाही...
Bus Accident : भरधाव बस नाल्यातील केंदाळात कोसळली; दोन वर्षाच्या लेकरासह मातेसह 8 जणांचा मृत्यू, मोदींकडून आर्थिक मदत जाहीर
भरधाव बस नाल्यातील केंदाळात कोसळली; दोन वर्षाच्या लेकरासह मातेसह 8 जणांचा मृत्यू, मोदींकडून आर्थिक मदत जाहीर
Manoj Jarange Patil : संतोष भैय्याला न्याय दिल्याशिवाय एकही मराठा मागे हटणार नाही; मनोज जरांगे कडाडले, CM फडणवीसांवर आरोप
संतोष भैय्याला न्याय दिल्याशिवाय एकही मराठा मागे हटणार नाही; मनोज जरांगे कडाडले, CM फडणवीसांवर आरोप
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं स्मारक बांधणार; काँग्रेसच्या पत्रानंतर केंद्र सरकारचा निर्णय
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं स्मारक बांधणार; काँग्रेसच्या पत्रानंतर केंद्र सरकारचा निर्णय
OTT Upcoming Release 2025: अॅक्शन-ड्रामा अन् बरंच काही; नव्या वर्षात मनोरंजनाची मेजवानी, नुसतं एन्टरटेन्मेंट, एन्टरटेन्मेंट आणि एन्टरटेन्मेंट
अॅक्शन-ड्रामा अन् बरंच काही; नव्या वर्षात मनोरंजनाची मेजवानी, नुसतं एन्टरटेन्मेंट, एन्टरटेन्मेंट आणि एन्टरटेन्मेंट
Embed widget