Zero Hour : PCMC Corporation : महापालिकेचे महामुद्दे : पिंपरी-चिंचवडमध्ये का होतंय प्रदूषण?ABP Majha
तुम्ही पाहताय एबीपी माझा... आणि एबीपी माझावर सुरुय झीरो अवर... मंडळी, झीरो अवरच्या दुसऱ्या सत्रात आपण पाहणार आहोत विविध शहरांमधल्या महापालिकेच्या महामुद्देमधील विशेष रिपोर्टस. त्यासाठी पहिल्यांदा जाऊयात पिंपरी चिंचवडला. मंडळी, कुणाला जर गंभीर दुखापत झाली तर आपण काय करू? त्या व्यक्तीला रुग्णालयात नेऊ... तिथं त्याच्यावर उपचार होतील, गरज पडली तर शस्त्रक्रिया करण्यात येईल. पण अशा व्यक्तीला आपण केवळ पट्टी लावून शांत बसू का? नक्कीच नाही. पण पिंपरी चिंचवड महापालिकेचं तसं नाही. या शहराची अवस्था प्रदूषणामुळं गंभीर आहे. पण कठोर उपाययोजना करण्याऐवजी काही यंत्रं रस्त्यावर उतरवून महापालिका शांत बसलीय. पाहूयात महापालिकेचे महामुद्देमधला पिंपरी चिंडवडचा विशेष रिपोर्ट.
प्रदूषणामुळे त्रस्त झालेल्या विश्वदीपा एकट्या नाहीयेत. पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात व्हायरल आजारांवर उपचार घेण्यासाठी दररोज ४५० ते ५०० रुग्ण येतायेत. त्यांच्यापैकी २५० ते ३०० रुग्णांना प्रदूषणामुळे हे आजार होत असल्याचं सांगितलं जातंय. हा केवळ पालिकेच्या रुग्णालयातला आकडा.. खासगी दवाखान्यांमधील रुग्णांची संख्या धरली तर हा आकडा हजारच्या पार जाईल.
लाखो वाहनांमधून बाहेर पडणारा कार्बन डायोक्साईड आणि नायट्रस ऑक्साईड.. शेकडो बांधकामांमुळे उडणारी धूळ, आणि ठिकठिकाणी कचरा जाळण्याचे प्रकार यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये प्रचंड प्रदूषण होतं. यावर कठोर आणि दीर्घकालीन उपाय काढणं पालिकेकडून अपेक्षित होतं. पण तसं झालं नाही.
All Shows

































