Zero Hour : फडणवीसांचं ते वक्तव्य अन् राजकारणाचं नवं पर्व? Pravin Darekar Sushma Andhare EXCLUSIVE
नमस्कार मी विजय साळवी.. एबीपी माझाच्या झीरो अवर या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत.
एबीपी माझाच्या जगभरातील तमाम प्रेक्षकांना नाताळच्या शुभेच्छा..
मंडळी.. २०२४ या सरत्या वर्षाचे आता अखेरचे अवघे सहा दिवस उरलेत.. त्यामुळं सारं जग... सध्या न्यू ईयर सेलिब्रेशनच्या मोडवर गेलंय.. मंडळी.. तुमचंही कदाचित पुढच्या पाच दिवसांचं प्लॅनिंग करुन झालं असेल... तुम्ही तुमच्या फेव्हरिट डेस्टिनेशनला पोहोचलाही असाल.. चला सुरुवात करुयात आजच्या झीरो अवरला...
मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय सुरु झालाय असं म्हणायला हरकत नाही.. कारण, मी द्वेषाचं राजकारण करणार नाही असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.. दोन वेगवेगळ्या विचारसरणीच्या मित्रांनाही सन्मानानं सोबत घेऊन.. त्यांनी महायुतीच्या नव्या सरकारचा गाडा हाकायला सुरुवात केलीय..
गेल्या अडीच वर्षांमध्ये महाविकास आघाडीनं ज्यांना वारंवार टार्गेट केलं... ते देवेंद्र फडणवीस... मी पुन्हा आलो पण दोन दोन पक्ष फोडून आलो.. असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस... आता मी सत्तेत आलोय.. पण विरोधकांना योग्य सन्मान देऊ अशी भाषा वापरु लागलेत.. एक तर तू राहशील.. किंवा मी राहीन.. असं फडणवीसांना उघड उघड आव्हान देणारे उद्धव ठाकरेही नागपुरात थेट त्यांच्या भेटीला पोहोचले..
मंडळी या सगळ्या गोष्टी आम्ही का सांगतोय.. तर त्याला कारण आहे नागपुरात झालेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषद...
नागपुरात आज नागपूर पत्रकार संघानं नव्या मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.. या कार्यक्रमातल्या औपचारिक सोहळ्यानंतर फडणवीसांनी पत्रकारांशी चर्चा केली.. त्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिली...
फडणवीसांच्या प्रत्येक उत्तरात कमालीचा राजकीय अनुभव दिसून येत होता.. खुद्द फडणवीसांनीही मुख्यमंत्री म्हणून आपल्या पहिल्या टर्ममध्ये आलेल्या अनुभवांचा उल्लेख करत... आपण कसे घडलो.. हे सविस्तर सांगितलं..
मंडळी.. देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषद असेल.. आणि त्यांना शरद पवारांवर प्रश्न येणार नाही.. असं कधीच होणारच नाही.. तसंच झालं.. शरद पवारांच्या राजकीय स्टाईलवर प्रश्न विचारला.. तेव्हा फडणवीसांनी दिलेल्या उत्तरातून अनेक गोष्टी स्पष्ट होतायत... त्याचं विश्लेषण आपण करणार आहोत.. पण आधी पाहूयात देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणालेत?