Zero Hour : अंबादास दानवेंचं निलंबन ते नार्वेकरांचं आमदारकीसाठी लॉबिंग; विधानपरिषदेत काय घडलं?
त्यात अजून एक राजकीय किनार आहे ती १२ जुलायला होणाऱ्या विधान परिषदेच्या ११ जागांच्या निवडणुकीची. त्यासाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. खरं तर ह्या निवडणुकीत असतो मतांचा कोटा. आपले पांघरून पाहूनच पक्ष उमेदवारांची संख्या ठरवत असतात ... पण महाराष्ट्राने ह्या निवडणुकांमध्ये घोडेबाजार बघितलाय ... तरीही हि निवडणूक बिनविरोध होईल असं वाटत असतानाच, उबाठा शिवसेनेनं मिलिंद नार्वेकरांना उमेदवारी दिली आणि ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात येऊन निवडणूक रंगतदार बनली. संख्याबळाचा विचार केला तर भाजपचे पाच, शिवसेनेचे दोन आणि राष्ट्रवादी दोन उमेदवार निवडून येऊ शकतात. काँग्रेसचाही एक उमेदवार निवडून येऊ शकतो. मग उरते फक्त एक जागा ... त्यामुळे महाविकासाघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि उबाठा शिवसेना मिळून तो एक उमेदवार निवडून येऊ शकतो. आता ठाकरेंनी अचानक मिलिंद नार्वेकरांना मैदानात उतरवलं आहे.
त्यामुळे अनेक इंटरेस्टिंग राजकीय प्रश्न निर्माण झाले आहेत?
हि रिस्क उद्धव ठाकरेंनी का घेतली?
मिलिंद नार्वेकरांनी जिंकवून आणण्यासाठी कुठल्या पक्षातील असंतुष्ट आमदारांनी मताचा हात पुढे केलाय?
जर नार्वेकर जिंकले, तर नक्की कोणाचा गेम होणार?
भाजपच्या पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांच्यातल्या एखाद्याचा गेम होणार कि शिवसेनेच्या कृपाल तुमाने किंवा भावना गवळी यांच्यापैकी एखाद्याचा ... कि मग अजित पवारांच्या राजेश विटेकर किंवा शिवाजीराव गर्जेंचा?
१२वा उमेदवार देण्याचा उद्धव ठाकरेंचा कॉन्फिडन्स हा लोक सभेच्या यशामुळे कि गुप्त वाटाघाटींमुळं ... हे जरी कळले नसले तरी मतांची जुळवाजुळव कशी करणार हा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारला असताना त्यांचे उत्तर इंटरेस्टिंग होते ...