Pahalgam Jammu & Kashmir | पहलगाम हल्ल्याला महिना, जखमा ताज्या; महिनाभरात काय बदललं? Special Report
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला आज एक महिना पूर्ण झाला...या एका महिन्यात खूप काही झालं असलं तरी हल्ल्याच्या जखमा अजून ताज्या आहेत...हल्ल्यातले पीडित अजून या दु:खातून सावरू शकले नाहीत...कटू आठवणी झटकून नव्यानं आयुष्याला सुरुवात करणं इतकं सोपही नाही...या हल्ल्यानं काश्मीरलाही काही वर्षं मागे नेलंय...पाहुयात एका महिन्यात काय बदललं...
बरोबर एक महिन्यापूर्वी याच तारखेला पृथ्वीवरचा स्वर्ग समजलं जाणारं काश्मीरमधलं पहलगाम रक्तबंबाळ झालं... माणसाचा मुखवटा चढवून आलेल्या नराधम दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली... त्यात महाराष्ट्रातल्याही पर्यटकांचा समावेश होता... पुण्यातील कौस्तुभ गणबोटे यांचा या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. काश्मीर पाहण्यासाठी गेलेल्या कौस्तुभ यांच्या मृत्यूमुळे आजही त्यांचे कुटुंबीय सावरलेलं नाही.
वडील जाऊन एख महिना झाला, पण हे सत्य स्वीकारणं अजून जगदाळे कुटुंबाला शक्यच झालं नाहीय...
जगदाळे कुुटुंबीयांनी पाण्यावल्या डोळ्यांनी एबीपी माझाशी आपल्या भावना बोलून दाखवल्या...
हल्ल्याच्या धक्क्यातून डोंबिवलीतले जोशी, मोने आणि लेले कुटुंबीयही अजून सावरलेले नाहीत.
खायला उठवणाऱ्या आठवणींतून बाहेर येण्यासाठी मोने कुटुंबीय त्यांचं डोंबिवलीतलं घरं बंद करून काही काळ दुसरीकडे राहायला गेलेत...
या हल्ल्यात पर्यटक जसे सावरू शकले नाहीत, तसंच काश्मीरही सावरलेलं नाहीय...
पर्यटकांनी गजबजलेलं काश्मीर गेल्या महिनाभरापासून पर्यटकांविना सुनसान झालंय...
या हल्ल्यानंतर भारतीय सैन्यानं काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना ठेचण्यासाठी ऑपरेशन लॉन्च केलं...
अनेक दहशतवाद्यांची घरं जमीनदोस्त केली...
अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला...
अगदी पाकिस्तानात हवाई हल्ला करून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले...
पण पहलगाममधले दहशतवादी अजूनही हाती लागलेले नाहीत...
त्यांना त्यांच्या पापाचा हिशेब द्यावाच लागणार आहे...
ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा...
All Shows

































