N D Mahanor Special Report : 'या नभाने या भुईला दान द्यावे..'; मराठी मातीतला रानकवी हरपला
ना. धों. महानोर हे गेल्या काही वर्षांपासून किडनीच्या आजारानं त्रस्त होते. पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. 'ना. धों. नावाचा वृक्ष आज उन्मळून पडला आहे,' अशी भावना शरद पवारांनी व्यक्त केली. 'शेतीवर त्यांचं विशेष प्रेम असल्यानं त्यांना विधान परिषदेत आमदारही केलं होतं,' अशी आठवणही पवारांनी ट्विटमधून सांगितली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ट्विट करून 'मराठी मातीतला रानकवी हरपला,' अशी भावना व्यक्त केली. 'पानझड', 'पळसखेडची गाणी', 'पावसाळी कविता' ही त्यांची समृद्ध साहित्यसंपदा होती. कविता आणि व्यक्तीचित्रण यासोबतच त्यांनी शेतीविषयक लिखाण केलं. भारत सरकारनं त्यांचा 'पद्मश्री' पुरस्कार देऊन सन्मानही केला होता.
All Shows
































